JOIN US
मराठी बातम्या / मनी / दिवाळीनंतरही सोन्याचे दर चढेच राहणार? काय सांगतोय बाजाराचा मूड

दिवाळीनंतरही सोन्याचे दर चढेच राहणार? काय सांगतोय बाजाराचा मूड

लग्नासाठी जर तुमच्या मुलीसाठी किंवा होणाऱ्या बायकोसाठी सोनं खरेदी करायची ही संधी सोडू नका.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले आहेत. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. लग्नासाठी जर तुमच्या मुलीसाठी किंवा होणाऱ्या बायकोसाठी सोनं खरेदी करायची ही संधी सोडू नका. दिवाळीनंतरही भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याच्या किंमतीत सुरुवातीच्या व्यापारात 0.03 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचबरोबर आज एमसीएक्सवर चांदीच्या दरात 0.01 टक्क्यांची घसरण झाली आहे. गुरुवारी वायदा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी 17 रुपयांनी कमी होऊन 50 हजार 670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याचा भाव आज 50,715 रुपयांवर उघडला. एकदा ते 50,600च्या वरही गेलं. नंतर तो किंचित हा भाव सावला आणि 50,715 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 7 रुपयांनी कमी होऊन 58,159 रुपयांवर पोहोचले. चांदीचा भाव 58,033 रुपयांवर मार्केट उघडताना होता. एकदा हा भाव 58,162 रुपयांपर्यंत गेला पण थोड्या वेळानं घट होऊन 58,033 रुपयांवर व्यापार सुरू झाला. सराफ बाजारातील दर आणि शेअर मार्केटमधील सोन्याच्या दरात मोठा फरक आहे. सराफ मार्केटमध्ये सोन्याचे दर धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाला 51 हजार 500 हून अधिक होते. 25 ऑक्टोबर रोजी जवळपास 53 हजारपर्यंत वाढले होते. आता दिवाळी संपल्यानंतर लगीन सराई सुरू होईल. त्यामुळे पुन्हा सोनं खरेदी वाढणार आहे. सोन्याला आणखी झळाळी येईल असं एकूणच दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात चढ उतार होत आहेत. असं असतानाही सराफ बाजारात मात्र सोन्याच्या किंमती चढ्या असल्याचं ग्राहकांना पाहायला मिळत आहे.

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या