JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / दिवाळीत दागिन्यांव्यतिरिक्त अशाप्रकारे करा सोन्यामध्ये गुंतवणूक, दरवर्षी मिळेल मोठा फायदा

दिवाळीत दागिन्यांव्यतिरिक्त अशाप्रकारे करा सोन्यामध्ये गुंतवणूक, दरवर्षी मिळेल मोठा फायदा

Gold Investment: तुम्ही देखील या दिवाळीला सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही दागिन्यांव्यतिरिक्त इतर काही पर्यायात देखील गुंतवणूक करू शकता.

0106

तुम्ही चार प्रकारे सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. दागिन्याव्यतिरिक्त तुम्ही म्युच्यूअल फंड, डिजिटल गोल्ड आणि सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीसाठी हे पर्याय उत्तम आहेत

जाहिरात
0206

फिजिकल गोल्ड- दागिन्यांमध्ये गुंतवणूक हा सोन्यातील गुंतवणुकीचा सर्वात जुना पर्याय आहे. सुरुवातीच्या काळात हा पर्याय सर्वात बेस्ट पर्याय होता. किंवा सोन्याच्या नाण्यात गुंतवणूक केली जात असे. तुम्ही सराफाकडून आता ऑनलाइन गोल्ड देखील खरेदी करू शकता

जाहिरात
0306

Gold Mutual Funds - सध्या गुंतवणूकदार म्युच्यूअल फंडच्या माध्यमातून देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. सध्या बाजारात याकरता अनेक पर्याय उपलब्ध आहे. सर्व म्युच्यूअल फंड बाजारातील चढउताराप्रमाणे रिटर्न देतात.

जाहिरात
0406

Digital Gold- याशिवाय तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. App किंवा मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये पैसे गुंतवू शकता. याशिवाय ब्रोकरेज कंपन्या एमएमटीसी-पीएएपी किंवा सेफगोल्डबरोबर टायअप करून देखील सोन्याची विक्री करतात. त्याचप्रमाणे कमोडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून देखील अशाप्रकारत्या सोन्याची खरेदी केली जाऊ शकते.

जाहिरात
0506

Sovereign gold bond- सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सरकारी आहे. यामध्ये सरकारकडू स्वस्त सोनेखरेदीची संधी मिळते. 2015 मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. यामध्ये तुम्हाला 2.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. तर SGB चा मॅच्यूरिटी पीरिएड आठ वर्षांचा असतो.

जाहिरात
0606

सामान्य नागरिकांना सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये जास्तीत जास्त 4 किलोंची गुंतवणूक करता येईल, तर हिंदू अविभाजित परिवार (एचयूएफ) साठी चार किलो आणि ट्रस्टसाठी ही मर्यादा 20 किलो आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या