नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने 51,625 रुपयांवर स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचे दरही खाली आले असून आता 59,725 रुपयांना विकले जात आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने, ही माहिती दिली आहे. जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत - सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 543 रुपयांनी घसरून 51,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 52,168 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीची किंमत किती - सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही 2,121 रुपयांनी घसरून 59,725 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 61,846 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. सोन्याचे दर असे पहा - हे दर तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता. तुम्ही घरबसल्या बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता. सोन्याचा परवाना क्रमांक, हॉलमार्क किंवा नोंदणी क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी काय कारवाई केली, याचीही माहिती मिळेल. आर्थिक वर्ष 22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात 55 टक्क्यांनी वाढली - महत्त्वाचे म्हणजे, 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती सुमारे 55 टक्क्यांनी वाढून $39.15 अब्ज झाली आहे. 2020-21 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात $25.40 अब्ज होती, अशी माहिती जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने दिली. हेही वाचा - या बँका देताएत एफडीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज, एका सरकारी बँकेचाही समावेश सोन्याच्या साठ्यात घट - 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 281 दशलक्ष डॉलरने घसरून 37605 अब्ज डॉलरवर आला आहे. यापूर्वी, 23 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा $37.886 अब्ज होता.