JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोने दर रेकॉर्ड स्तराजवळ, खरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव

Gold Price Today: कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोने दर रेकॉर्ड स्तराजवळ, खरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज गोल्ड 0.76 टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह ट्रेड करत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज वाढ झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : सोने दरात तेजी (Gold Price Today) पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर लवकर खरेदी करा. कारण जाणकारांनुसार 2022 मध्ये सोन्याचे दर (Gold Price) 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतात असा अंदाज आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज गोल्ड 0.76 टक्क्यांच्या मोठ्या तेजीसह ट्रेड करत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज वाढ झाली आहे. काय आहे सोने-चांदी भाव? (Gold Silver Price) - एप्रिल डिलीवरी सोन्याचा दर आज 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 50,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 1.10 टक्क्यांनी वधारला आहे. या वाढीसह चांदीचा दर 64,289 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. 5740 रुपये स्वस्त सोनं - ऑगस्ट 2020 मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर एप्रिल वायदे भाव 50,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्यावर्षीच्या उच्चांकापेक्षा सोनं आज 5740 रुपयांनी स्वस्त आहे.

हे वाचा -  Digital Goldमध्ये केवळ 1 रुपयापासून सुरू करू शकता गुंतवणूक,पाहा महत्त्वाचे फायदे

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा -  Investment Tips : ETF ची योग्य निवड कशी करावी? गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी तपासा

कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या