JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Rate Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

Gold Rate Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतारादरम्यान सोमवारी भारतीय बाजारात सोने-चांदी दरात (Gold-Silver Rate) बदल झाले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतारादरम्यान सोमवारी भारतीय बाजारात सोने-चांदी दरात (Gold-Silver Rate) बदल झाले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी सोनं आणि चांदी दोन्हीच्या किमतीत घसरण झाली आहे आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा वायदे भाव 155 रुपयांनी कमी होऊन 51,721 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold Price Today) पोहोचला. हा भाव 24 कॅरेट सोन्याचा आहे. सोन्याचा भाव 51,721 रुपयांनी ट्रेड करत आहे. चांदीचा वायदे भावही आज कमी झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचा वायदे भाव 316 रुपयांच्या नुकसानासह 68,520 रुपये प्रति किलोग्रॅम (Silver Price Today) आहे. चांदीचा भाव 68,511 रुपयांनी ट्रेड करत होता. परंतु त्यानंतर काहीसा भाव वाढून 68,520 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात तेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरातील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावरही पाहायला मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेलं युद्ध संपल्यानंतर सोने दरात घसरण होईल असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून ते ग्लोबल मार्केटमध्ये विकण्याचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होऊ शकतात. युक्रेनने रशियाच्या अटी मानून युद्ध संपवल्याचे संकेत दिले आहेत. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा -  दर महिना 6000 रुपये गुंतवणूक करुन बनाल करोडपती, पाहा कसं आहे Calculation

कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या