JOIN US
मराठी बातम्या / मनी / Future Group च्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांपर्यंत वाढ; Reliance ने 200 स्टोअर ताब्यात घेतल्याचा फायदा

Future Group च्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांपर्यंत वाढ; Reliance ने 200 स्टोअर ताब्यात घेतल्याचा फायदा

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) फ्यूचर रिटेलच्या किमान 200 स्टोअर्सचा ताबा घेतला आहे. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील समूह लीज पेमेंट करण्यात अयशस्वी झाल्यानंतर रिलायन्सने या स्टोअर्सचा ताबा घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28  फेब्रुवारी : रोखीच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या फ्युचर ग्रुप (Future Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. याचे कारण रिलायन्सने (Reliance) फ्युचर ग्रुपच्या 200 स्टोअरचे कामकाज ताब्यात घेतल्याचे मानले जात आहे. रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) फ्यूचर रिटेलच्या किमान 200 स्टोअर्सचा ताबा घेतला आहे. किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील समूह लीज पेमेंट करण्यात अयशस्वी झाल्यानंतर रिलायन्सने या स्टोअर्सचा ताबा घेतला आहे. कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली आहे. फ्युचर ग्रुपचे शेअर्स 19 टक्क्यांनी वाढले यानंतर, फ्यूचर सप्लाय चेन सोल्युशन्सचे (Future Supply Chains) 17 टक्क्यांनी वाढून 71.50 रुपयांवर पोहोचले. फ्युचर रिटेल (FUTURE RETAIL) 13 टक्क्यांनी वाढून 51.75 रुपयांवर आणि फ्युचर मार्केट नेटवर्क (FUTURE MARKET NETWORK) 10 टक्क्यांनी वाढून 9.70 रुपयांवर पोहोचले. तर फ्यूचर एंटरप्रायझेस ( FUTURE ENTERPRISES) आणि फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन्स (FUTURE LIFESTYLE FASHIONS) 9 टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 8.99 रुपये आणि 56.35 रुपये झाले. फ्युचर कन्झुमर (FUTURE CONSUMER) 7 टक्क्यांनी वाढून 7.36 रुपये झाले आहे. फ्युचर एंटरप्रायजेस डीव्हीआर (FUTURE ENTERPRISES DVR) 19 टक्क्यांनी वाढून 12.85 रुपये झाला. बिग बाजार दोन दशकांपूर्वी सुरू झाला फ्युचरचे 1,700 पेक्षा जास्त आउटलेट्स असले तरी, ही सर्व 200 स्टोअर्स जी रिलायन्स रीब्रँड करणार आहेत ती ग्रुपच्या प्रमुख सुपरमार्केट चेन बिग बझारची असतील. किशोर बियाणी यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी हे सुरू केले होते. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने काही स्टोअरचे लीज त्यांच्या नावावर हस्तांतरित केले होते आणि त्यांना भविष्यासाठी भाडेतत्त्वावर दिले होते, परंतु आता ते स्वतःच्या हातात घेत आहे. रिलायन्सने स्टोअरच्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या अटींवर नोकऱ्या देऊ केल्या आहेत. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमध्ये 24,713 कोटींचा करार कंपनीला अपेक्षा आहे की रिलायन्ससोबतची प्रस्तावित व्यवस्था लागू केली जाईल, ज्यामुळे सर्व भागधारकांना फायदा होईल, असे कंपनीने म्हटले आहे. ऑगस्ट, 2020 मध्ये, फ्युचर रिटेल लिमिटेड, फ्युचर ग्रुप कंपन्या आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्यूझर ग्रुपचा रिटेल आणि लॉजिस्टिक व्यवसाय RRVL कडे हस्तांतरित करण्यासाठी 24,713 कोटी रुपयांची एकवेळची योजना मंजूर केली. फ्युचरवर कर्जदार आणि जमीनदारांना 6,000 कोटी देणे बाकी फ्युचर ग्रुप गंभीर आर्थिक संकटात होता. भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेची थकबाकी वाढली आहे. कर्जदार आणि जमीनदारांची थकबाकी 6,000 कोटींच्या पुढे गेली आहे. रिलायन्सने थकबाकी भरण्यासाठी आतापर्यंत 1,500 कोटी रुपये खर्च केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या