JOIN US
मराठी बातम्या / मनी / Inflation: बिस्किट खाणे महागणार, FMCG कंपन्या 10 टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याच्या तयारीत

Inflation: बिस्किट खाणे महागणार, FMCG कंपन्या 10 टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याच्या तयारीत

डाबर आणि पार्ले सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आणि महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी ते विचारपूर्वक पावले उचलतील. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्ले यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत, असे काही माध्यमांनी सांगितले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च : महागाईमुळे सगळेच त्रस्त झाले आहेत. नागरिकांना आता दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी त्यांचा खिसा अधिक मोकळा करावा लागत आहे. गहू, पाम तेल आणि पॅकेजिंग वस्तूंसारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे FMCG कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धामुळे FMCG कंपन्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे. अशा परिस्थितीत काही खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकणे गरजेचे झाले आहे. डाबर आणि पार्ले सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आणि महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी ते विचारपूर्वक पावले उचलतील. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्ले यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत, असे काही माध्यमांनी सांगितले. किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात पार्ले प्रॉडक्ट्सचे (Parle Products) वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह म्हणाले की, आम्हाला उद्योगाच्या बाजूने किमतीत 10 ते 15 टक्के वाढ अपेक्षित आहोत. दरात प्रचंड चढ-उतार होत आहे. अशा परिस्थितीत भाव किती वाढतील हे सांगणे कठीण आहे. पामतेलाचा भाव 180 रुपये प्रति लिटरवर गेल्याचे त्यांनी सांगितले. आता तो 150 रुपये प्रति लिटरवर आला आहे. त्याचप्रमाणे, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्यानंतर 100 डॉलरवर आली आहे. Supermarket Strategy: सुपरमार्केटमध्ये असा कापला जातो तुमचा खिसा कसा आणि तुम्हाला कळतंही नाही उत्पादन खर्च जास्त पूर्वीपेक्षा अजूनही भाव जास्त असल्याचे शहा सांगतात. गेल्या वेळी FMCG कंपन्यांनी वस्तूंच्या किमती वाढवण्याचा भार पूर्णपणे ग्राहकांवर टाकला नाही. आता प्रत्येकजण 10-15 टक्के वाढीबद्दल बोलत आहे. मात्र, उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. ते म्हणाले की, पार्ले येथे सध्या पुरेसा साठा आहे. दरवाढीचा निर्णय एक-दोन महिन्यांत घेतला जाईल. डाबर इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी अंकुश जैन यांनी सांगितले की, महागाई अजूनही उच्च पातळीवर आहे आणि हे सलग दुसऱ्या वर्षी चिंतेचे कारण आहे. ते म्हणाले, महागाईच्या दबावामुळे ग्राहकांनी खर्च कमी केला आहे. ते लहान पॅक खरेदी करत आहेत. Multibagger Stock: आठ वर्षात 10 हजार बनले 60 लाख, आता पुन्हा का चर्चेत आहे ‘हा’ केमिकल स्टॉक? कंपन्याचा ग्राहकांवर बोजा एडलव्हाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष अबनीश रॉय म्हणाले की, एफएमसीजी कंपन्या महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यांच्याकडे उच्च किंमत निश्चित करण्याची ताकद आहे. कॉफी आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरवाढीचा बोजा ते ग्राहकांवर टाकत आहेत. आमचा अंदाज आहे की 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत सर्व FMCG कंपन्या किमतीत तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या