मुंबई, 10 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काही दिवस कमी होतात पण नंतर किमती वाढू लागतात. आज कच्च्या तेलाचा दर पुन्हा ९० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला आहे. तर तीन-चार आधीच घसरून ८८ डॉलरवर आला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर घसरण्यासाठी लोकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते. विकेण्डला जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही टाकी पूर्ण भरण्याआधी आजचे पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत हे पाहा. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर - मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर - चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर - कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर देशात यूपी-बिहारच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलमध्ये दर बदलले आहेत. यूपीच्या नोएडा-ग्रेटर नोएडामध्ये पेट्रोल 16 पैशांनी घसरून 96.76 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 15 पैशांनी घसरून 89.93 रुपये प्रति लिटरवर आले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महागले आणि ते 96.57 रुपये प्रति लिटरने विकले गेले. तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोलची किंमत 65 पैशांनी घसरून 107.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 61 पैशांनी घसरून 94.25 रुपये झाली आहे. पेट्रोल डिझेलचे दर रोज बदलतात. SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून काय किंमत आहे ते पाहू शकतात.