फ्लाइंट अटेंडेंटचे सीक्रेट
Airplane Facts : गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे विमान कंपन्या जोरदार चर्चेत आहेत. प्रवासी, क्रू मेंबर्सच्या वर्तणुकीमुळे तसंच विमानसेवेतील अडचणींमुळे विमान कंपन्या नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहत आहेत. सोशल मीडियावर देखील या गोष्टी सातत्याने व्हायरल होत आहेत. बऱ्याचदा काही क्रू मेंबर्स त्यांचे कामादरम्यानचे अनुभव शेअर करत असतात. खरं तर क्रू मेंबर्सचं काम, त्यांचा पेहराव, विमानातील सुविधा, फ्लाईट ऑपरेशन्स या गोष्टी प्रवाशांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. सध्या अशाच एका फ्लाईट अटेंडंटची पोस्ट जोरदार चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान आमच्या युनिफॉर्मच्या आतमध्ये एक गोष्ट आम्ही लपवलेली असते, असं ही अटेंडंट या पोस्टमध्ये सांगत आहे. त्यामुळे या अटेंडंटचं टॉप सिक्रेट सध्या चर्चेत आहे. हे सिक्रेट कोणतं ते सविस्तर जाणून घेऊया. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. विमानांची दुनिया या सिरीजमधून आपण याविषयी जाणून घेणार आहोत. विमान प्रवासादरम्यान आकर्षक ड्रेसमधील एअर होस्टेस प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असतात. पण त्यांच्या युनिफॉर्मच्या अनुषंगाने अनेक अशी गुपितं असतात जी सामान्य प्रवाशांना माहिती नसतात. प्रत्येक विमान कंपनीच्या केबिन क्रू आणि फ्लाईट अटेंडंट्सचे युनिफॉर्म अर्थात गणवेश वेगवेगळे असतात. अमिरात एअरलाइन्सच्या एका फ्लाईट अटेंडंटने त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत असलेले टॉप सिक्रेट नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Airplane facts: एवढ्या स्पीडमध्येही का फुटत नाहीत विमानाचे टायर? त्यात कोणता गॅस असतो? या पूर्वी अशाच एका फ्लाईट अटेंडंटने काही खुलासे केले होते. ते ऐकून विमान प्रवास करणाऱ्यांना धक्का बसला होता. त्यात तिनं सांगितलं की, ``फ्लाईटमध्ये कधीही चहा किंवा कॉफी मागू नका. कारण विमानातील पाण्याची टाकी नियमित स्वच्छ केली जात नाही.`` या एअर होस्टेसने आणखी काही गुपितं शेअर केली होती. यापूर्वी `सेन्स द लेन्स` या चॅनेलवर काही माजी फ्लाईट अटेंडंटनी प्रवासाचे अनुभव शेअर करताना आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांच्या युनिफॉर्ममध्ये लपवलेले एक रहस्य उघड केले होते. या व्हिडिओत त्यांनी कपड्यांमध्ये लपवलेल्या कॅमेराबद्दल सांगितलं होतं. ``एखाद्या प्रवाशाने गैरवर्तन केलं तर त्याचं लाइव्ह रेकॉर्डिंग व्हावं यासाठी असे कॅमेरे युनिफॉर्ममध्ये लपवलेले असतात,`` असं फ्लाईट अटेंडंटनं सांगितलं. ``बऱ्याचदा प्रवासी काही प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळे या प्रश्नांचा अंदाज घेत आम्ही माहिती जमा केलेली असते. अटेंडंट हा प्रवाशाजवळ जात नाही. त्यामुळे प्रवासी संतापतो आणि वारंवार प्रश्न विचारू लागतो. अशावेळी अटेंडंट त्याला काहीतरी कारणं सांगतात. पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत,`` असं फ्लाईट अटेंडंटने सांगितलं होतं. First Aiport : देशातील पहिलं एयरपोर्ट कुठेय? 90 वर्षांपूर्वी उतरलं पहिलं विमान; पाहा आता कशासाठी होतो वापर ``काही वेळा फ्लाईटमध्ये वेगळा वास येतो. त्यावेळी प्रवासी काही समस्या नाही ना असा प्रश्न अटेंडंटला विचारतात. अशावेळी अटेंडंट स्मितहास्य करून विमानात असा वास येणं सामान्य आहे, असं उत्तर देतात. हे उत्तर देताना स्वतः अटेंडंट मनातून घाबरलेले असतात. कामाच्या वेळी प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही चूक नसताना वारंवार सॉरी म्हणावं लागतं. प्रवाशाला बरं वाटावं, त्याचा आत्मसन्मान दुखावला जाऊ नये, यासाठी अटेंडंटला चेहऱ्यावर हास्य ठेवत सॉरी म्हणावं लागतं. मात्र वारंवार असं केल्याने अटेंडंटच्या मनात निराशा तयार होते,`` असं या अटेंडंटने सांगितले. अमिरात एअरलाइन्सच्या फ्लाईट अटेंडंटने अशाच प्रकारचं एक सिक्रेट सोशल मीडियावरून नुकतंच शेअर केलं आहे. `डेली स्टार`ने दिलेल्या वृत्तानुसार, या फ्लाईट अटेंडंटचं नाव डॅनियल आहे. तिनं @danudboyy या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत काही सीक्रेटविषयी माहिती दिली आहे. ती म्हणाली, ``अमिरात एअरलाइन्सच्या फ्लाईट अटेंडंटच्या युनिफॉर्मचा रंग गडद पिवळा आहे. हा रंग वाळवंटाचं प्रतीक आहे. आमचा ड्रेस वॉटर प्रूफ असतो. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला हातात घड्याळ घालणं बंधनकारक आहे.`` डॅनियलने दिलेल्या माहितीनुसार, ``प्रत्येक क्रू मेंबरला त्यांच्या युनिफॉर्मच्या आत एक आरामदायी पायजामा परिधान करावा लागतो. हा पायजामा आम्हाला आमच्या कंपनी व्यवस्थापनाकडून दिला जातो. त्याच्यामागे क्रू असं लिहिलेलं असतं. जर एखाद्या प्रवाशानं आम्हाला अशा युनिफॉर्ममध्ये पाहिलं तर त्याला हे क्रू मेंबर आहे असं समजावं यासाठी ते लिहिलेलं असतं. लांबच्या प्रवासादरम्यान आम्ही परवानगी घेऊन युनिफॉर्म काढून ठेवून हा पायजमा परिधान करून झोपू शकतो.`` डॅनियलने युनिफॉर्म विषयी सांगितलेले टॉप सिक्रेट बहुतांश प्रवाशांना माहिती नसेल.