फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
मुंबई, 7 एप्रिल: घर किंवा फ्लॅट खरेदी करणे हा जीवनातील एक महत्त्वाचा भाग असतो. आपल्या हक्काचे घर असावे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक वर्षे बचत करून आणि नियोजन केल्यानंतर आपल्याला बेस्ट घर मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. पण, सर्वांची ही इच्छा पूर्ण होत नाही. सोसायटीत घर घेताना बहुतांश लोक बिल्डरच्या गोड-गोड बोलण्यामध्ये येतात आणि अनेकदा स्वतःची फसवणूक करुन घेतात.
सामान्यतः लोक विविध सुविधांच्या नादात काही मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळे तुम्हीही एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल, तर बिल्डर किंवा प्रॉपर्टी डीलरच्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस किंवा जिमच्या गुणगाणाकडे दुर्लक्ष करा आणि त्याला काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करा. या सुविधा कोणत्या याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी तुम्ही पहिली गोष्ट तपासली पाहिजे ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा. सोसायटीमध्ये पूर्ण लोक राहायला आल्यानंतर प्रत्येकाला पूर्ण पाणी मिळेल का याची खात्री करा. तिथं पाण्याची योग्य व्यवस्था नसेल, तर तुम्हाला खूप त्रास होईल. तसेच, तुमचा मेंटेनन्स चार्ज देखील वाढेल.
‘ही’ सरकारी बँक FD वर देतेय भरघोस रिटर्न, जाणून घ्या किती मिळतंय व्याज?प्रत्येक सोसायटीला सीवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवून सोसायटीतीलच घाण पाण्याची विल्हेवाट लावावी लागते. परंतु, अनेक बांधकाम व्यावसायिक हे करत नाहीत. घरांमध्ये निघणारे खराब पाणी ते टँकसरने स्वच्छ करतात. त्याचे पैसेही मेंटेनन्स चार्जमध्ये जोडले जातात. त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या लोकांचा खर्च वाढतो. त्यामुळेच फ्लॅट घेण्यापूर्वी सीवरेज सिस्टीम नक्की तपासा.
Axis बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी गुडन्यूज! आता मिळतेय ‘ही’ खास सुविधातिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे मेंटेनन्स चार्ज तपासणे. मेंटेनन्स चार्जेस म्हणजे सोसायटी आणि सामान्य सुविधांसाठी दरमहा भरावे लागणारे पैसे. साधारणपणे बिल्डर फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना योग्य माहिती देत नाहीत. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी मेंटेनन्स चार्जेसबद्दल अवश्य बोला. कारण हे तुम्हाला आयुष्यभर भरावे लागते. जास्त मेंटेनन्स चार्ज आकारणाऱ्या सोसायटीमध्ये घर घेणे भविष्यात तुमच्या खिशाला खूप जड ठरू शकते.
घराची निवड करताना पार्किंगची जागा असणं गरजेचं आहे. पार्किंगची जागा फक्त फ्लॅटसोबत उपलब्ध आहे. परंतु, अनेक बांधकाम व्यावसायिक पार्किंगच्या नावाखाली घराच्या किंमतीत भरमसाठ वाढ करतात. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी पार्किंगसाठी किती जागा मिळेल? यातून तुमचे काम होईल का, इत्यादी गोष्टींची कसून चौकशी करा.
तुम्ही जिथे फ्लॅट घेत आहात, तो प्रकल्प रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी किंवा RERA (RERA) कडे नोंदणीकृत आहे की नाही हे एकदा चेक करुन घ्या. RERA मध्ये प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे म्हणजे तुम्हाला तिथे सर्व सुविधा मिळतील याची खात्री नसते. परंतु RERA नोंदणीकृत प्रकल्पात घर खरेदी करण्याचे फायदे म्हणजे त्या प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाची माहिती जसे की एकूण घरांची संख्या, कार्पेट एरिया, कंस्ट्रक्शन मटीरियल हे सर्व सहज रेग्युलेटरकडून मिळतात.