JOIN US
मराठी बातम्या / मनी / नवीन वर्षापूर्वी आनंदाची बातमी! या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ, पाहा नवीन दर

नवीन वर्षापूर्वी आनंदाची बातमी! या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ, पाहा नवीन दर

नवीन वर्षाच्या आधी सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.

जाहिरात

file photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : तुम्ही पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग स्कीम, एमआयएस, सुकन्या समृद्धी योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण नवीन वर्षाच्या आधी सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. सरकारने व्याजदरात 1 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 1 जानेवारी 2023 च्या पहिल्या तिमाहीसाठी, म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी काही लहान बचत योजनांवरील व्याजदर 0.20 वरून 1.10 टक्के करण्यात आले आहेत. या वाढीनंतर छोट्या बचत योजनांचे व्याजदर 4.0 टक्क्यांपासून 7.6 टक्क्यांपर्यंत आहेत. सरकारने 1-वर्ष, 2-वर्ष, 3-वर्षे, 5-वर्षीय मुदत ठेवींसाठी व्याजदरात वाढ केली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठीही व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या