JOIN US
मराठी बातम्या / मनी / Nirmala Sitharaman Health Update : बजेटआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण रुग्णालयात, मोठी माहिती आली समोर

Nirmala Sitharaman Health Update : बजेटआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण रुग्णालयात, मोठी माहिती आली समोर

Nirmala Sitharaman Health Update : संपूर्ण देशाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटमध्ये कोणत्या गोष्टी मांडणार याची प्रतिक्षा असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात

निर्मला सीतारमण यांची प्रकृती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : बजेट अवघ्या एका महिन्यावर आलं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण देशाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटमध्ये कोणत्या गोष्टी मांडणार याची प्रतिक्षा असताना ही बातमी समोर आली आहे. CNN-न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, 63 वर्षीय सीतारमण यांना दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयातील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ तोंडावर असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी 2023 चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी एम्स दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहे.

Money Tips: बंद झालेलं NPS खातं पुन्हा कसं सुरू करायचं? Venugopal Dhoot : ICICI बँक कर्ज प्रकरण, कोचर दाम्पत्यापाठोपाठ CBI ची आणखी एक मोठी कारवाई

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अर्थमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना रूटीन चेकअप साठी रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. “गंभीर किंवा घाबरण्यासारखे काहीही नाही. असं रॉयटर्सने त्याच्या जवळच्या एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या