JOIN US
मराठी बातम्या / मनी / Fake Shopping Website: बनावट शॉपिंग वेबसाइटवर क्लिक कराल तर लागेल चुना, ‘या’ 5 सोप्या मार्गांनी ओळखा

Fake Shopping Website: बनावट शॉपिंग वेबसाइटवर क्लिक कराल तर लागेल चुना, ‘या’ 5 सोप्या मार्गांनी ओळखा

Fake Shopping Website: शॉपिंग वेबसाइटच्या नावाखाली लूट करणं, हे सायबर गुन्हेगारांचं रोजचं काम आहे. कारण तेथे लाखोंचे व्यवहार होतात.

जाहिरात

Fake Shopping Website: बनावट शॉपिंग वेबसाइटवर क्लिक कराल तर लागेल चुना, ‘या’ 5 सोप्या मार्गांनी ओळखा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै : डिजिटल जगानं आपलं काम जितकं सोपं केलं आहे, तितकेच अडचणीचे मार्गही खुले केले आहेत. घरी बसून आपण काही क्लिक्समध्ये स्वदेशी- विदेशी ब्रँडच्या वस्तू खरेदी करतो आणि ऑनलाईन पेमेंट करतो. हे काम करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. प्रत्येकाला महागड्या आणि ब्रँडेड वस्तू स्वस्तात हव्या असतात. लोकांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन फसवणूक करणारे बनावट शॉपिंग वेबसाइट तयार करतात. या वेबसाइट्सवर मोठ्या ब्रँड्सच्या वस्तूंवर भरघोस सूट देण्याचा दावा केला जातो. महागड्या वस्तू स्वस्तात विकत घेण्याच्या लोभापायी सर्वसामान्य लोक अडकतात. त्यामुळं बनावट शॉपिंग वेबसाइट्स ओळखता येणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या कशा ओळखायच्या हे आज आपण जाणून घेणार आहोत. बनावट शॉपिंग वेबसाइट्स - बनावट शॉपिंग वेबसाइट्स अनेक प्रकारच्या असू शकतात. ज्यांना या वेबसाइट्सची माहिती असेल, ते या वेबसाइट्सवरून शॉपिंग करणं टाळतील आणि खात्री पटल्यानंतरच त्या वेबसाइटवर क्लिक करतील- 1. फिशिंग वेबसाइट (Phishing Website): या वेबसाइट्सचे स्वरूप, रंग, लोगो, नाव, फॉन्ट अगदी कोणत्याही प्रसिद्ध शॉपिंग किंवा ई-कॉमर्स वेबसाइटसारखंच असतं. जर तुम्ही खरी आणि बनावट वेबसाइट ओळखण्यात चूक केली, तर तुम्ही पेमेंटसाठी क्लिक करताच तुमच्या कार्डवरील सर्व डेटा चोरीला जाईल. म्हणून, कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा वेबसाइटवर क्लिक करण्यापूर्वी, त्याचा लोगो, डोमेन इ. बारकाईने तपासा. 2. स्वतंत्र वेबसाइट (Independent Website): या वेबसाइट कोणत्याही वेबसाइटची कॉपी नसतात, परंतु त्यावर ब्रँडेड वस्तू स्वस्त दरात उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. वेबसाइटवर मालाचा फोटो टाकूनच ऑर्डर घेतली जाते. तुम्ही ऑर्डर देता पण ती वस्तू तुमच्या घरी कधीच पोहोचणार नाही, कारण वेबसाइटवर फक्त उत्पादनांची छायाचित्रे टाकली जातात. तुमचा आणि तुमच्या कार्डचा तपशील चोरणं हा त्यामागचा खरा उद्देश असतो. हेही वाचा:  Personal loan: ‘या’ गोष्टींसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन, व्याज भरून व्हाल कंगाल बनावट वेबसाइट कशी ओळखायची? URL मध्ये https आणि Lock चिन्ह पाहा. जर वेबसाइट लिंकच्या सुरुवातीला https:// चिन्ह दिसत नसेल तर समजून घ्या की, तुम्ही बनावट वेबसाइटवर आहात. लुक, लोगो आणि फॉन्ट काळजीपूर्वक पहा. बनावट वेबसाइटचे स्पेलिंग, फॉन्ट प्रकार मूळ वेबसाइटसारखेच असतात. उदाहरणार्थ, Amazon ऐवजी, बनावट वेबसाइटचे नाव Amezon असेल. अशी उलटसुलट नावं दिसताच सावध व्हा.

हे लक्षात ठेवा की फसवणूक शॉपिंग वेबसाइट जाहिरात आणि SEO तंत्राद्वारे Google वर स्वतःला स्थान देते. गुगल रँकिंग मिळताच त्या वेबसाइटचा ट्रॅफिक वाढतो आणि लोकांना वाटतं की ते लोकप्रिय आणि विश्वासार्ह साइटवरून खरेदी करत आहेत. परंतु प्रत्येक डिजिटल पेमेंट किंवा ऑनलाइन माहिती शेअर करताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या