JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल

तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) अलीकडेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ABRY अंतर्गत नोंदणीची तारीख वाढवण्याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. नोंदणीची सुविधा 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana) अंतर्गत नोंदणीची सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) अलीकडेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ABRY अंतर्गत नोंदणीची तारीख वाढवण्याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. EPFO ने ट्वीटमध्ये म्हटले आहे की ABRY अंतर्गत नोंदणीची सुविधा 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ABRY योजनेची ठळक वैशिष्ट्ये » EPFO ​​मध्ये नोंदणीकृत कार्यालयातील नियोक्ते आणि नवीन कर्मचाऱ्यांसाठी इन्सेटिव्ह उपलब्ध आहे. » नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोंदणीच्या तारखेपासून दोन वर्षांसाठी इन्सेटिव्ह मिळते. » पेमेंटवरही इन्सेटिव्ह मिळते. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचे योगदान जे पगाराच्या 24 टक्के आहे. 1000 कर्मचाऱ्यांवर मिळते. 1000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कार्यालयात, कर्मचाऱ्याला EPF मध्ये 12 टक्के भरावे लागते. » किमान नवीन कर्मचार्‍यांची संख्या जोडल्यास इन्सेटिव्ह उपलब्ध आहे. » 15000 पेक्षा कमी मासिक पगारासह रुजू होणार्‍या नवीन कर्मचार्‍यांना नोंदणीच्या तारखेपासून 24 महिन्यांसाठी लाभ मिळण्यास पात्र आहे. » 1 ऑक्टोबर 2020 नंतर EPFO ​​मध्ये नोंदणीकृत कार्यालयांना नवीन कर्मचाऱ्यांसह लाभ मिळतात. Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स ABRY योजना आत्मनिर्भर भारत रोजगार योजने अंतर्गत, सरकार 1,000 कर्मचारी असलेल्या आस्थापनांच्या संदर्भात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांच्या 24 टक्के (दोन्हींच्या पगाराच्या 12 टक्के) अदा करत आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा जास्त असल्यास सरकार 12 टक्के कर्मचाऱ्यांचे योगदान देईल. 4 डिसेंबर 2021 पर्यंत, 39.73 लाख नवीन कर्मचार्‍यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि त्यांच्या खात्यात 2612.10 कोटी रुपयांचा नफा अॅडव्हान्स जमा करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या