मुंबई : EPFO कडून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ही गुडन्यूज आहे. EPFO ने जास्त पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक त्रुटी आणि नव्या नियमांमुळे संभ्रम उडालेल्या लोकांना आता पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. EPFO ने साधारण एक महिन्याहून अधिक काळ दिला आहे. जास्त पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत ही २६ जून असेल अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर मात्र ही डेटलाईन पुन्हा वाढेल की नाही याबाबत सध्या तरी कोणतेही संकेत मिळाले नाहीत. त्यामुले तुम्ही जर EPFO मध्ये जास्त पेन्शनचा पर्याय निवडणार असाल तर तुमच्याकडे आता महिन्याभराचा वेळ आहे.
EPFO : पासबुक पाहण्यात अडचणी, एका SMS वर चेक करा खात्यावरील बॅलन्सकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सदस्य त्यांच्या नियोक्त्यांसह 26 जून 2023 पर्यंत उच्च निवृत्ती वेतन (EPFO उच्च निवृत्ती वेतन) चा पर्याय निवडून संयुक्तपणे अर्ज करू शकतात. त्यांना यासाठी रिटायरमेंट फंड बॉडी ईपीएफओच्या युनिफाइड मेंबर्स पोर्टलवर अर्ज करावा लागेल. कोण अर्ज करू शकतो -1 सप्टेंबर 2014 पर्यंत ईपीएफओचे मेंबर राहिलेले लोक -1 सप्टेंबर 2014 च्या पूर्वीपासून ईपीएसचे सदस्य असणारे लोक -15,000 च्या लिमिटपेक्षा जास्त योगदान करणारे लोक -जे लोक ईपीएफचे सदस्य 1 सप्टेंबर 2014 नंतर बनले होते ते लोक
अर्ज कसा करायचा? तुम्ही EPFO वेबसाइटला भेट देऊन हायर पेन्शनसाठी अर्ज करू शकता. येथे त्यांना त्यांचा UAN, नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर सादर करावा लागेल. यानंतर त्यांना एक ऑथोरायझेशन पिन मिळेल ज्याचा वापर करून ते आपला अर्ज सबमिट करू शकतात. एक यासोबतच ईपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज उपलब्ध आहे परंतु ईपीएसच्या रकमेवर अशी कोणतीही तरतूद नाही.