JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या 5 चुका केल्यास काढता येणार नाही खात्यातील रक्कम

PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या 5 चुका केल्यास काढता येणार नाही खात्यातील रक्कम

जर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत तर या 5 चुका टाळणे गरजेचे आहे. या चुकांकडे लक्ष न दिल्यास तुमचा PF विड्रॉल क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.

0106

जर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत तर या 5 चुका टाळणे गरजेचे आहे. या चुकांकडे लक्ष न दिल्यास तुमचा PF विड्रॉल क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.

जाहिरात
0206

बँक खात्याची चुकीची माहिती- पीएफचे क्लेम केलेले पैसे त्याच खात्यामध्ये जमा होतील, जे खाते EPFO च्या रेकॉर्डमध्ये रजिस्टर असेल. त्यामुळे क्लेम करताना बँक खात्याची माहिती लक्ष देऊन भरा. जर तुम्ही खाते क्रमांक किंंवा दुसऱ्या खात्याचा नंबर एंटर केलात तर तुमचा अर्ज रद्द होईल.

जाहिरात
0306

अपूर्ण केवायसी - जर खातेधारचे केवायसी डिटेल्स अपूर्ण असतील तरी देखील पैसे काढण्यासाठी केलेला क्लेम रद्द होऊ शकतो. तुमचे केवायसी डिटेल्स पूर्ण होण्याबरोबर व्हेरिफाय देखील झालेले असणे गरजेचे आहे. केवायसी डिटेल्स पूर्ण आहेत का किंवा व्हेरिफाय केलेले आहेत का याची तपासणी तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करून करू शकता.

जाहिरात
0406

चुकीची जन्मतारिख - ईपीएफओ मध्ये दाखल करण्यात आलेली जन्मतारीख आणि तुमच्या कंपनीच्या रेकॉर्डमध्ये असणारी जन्मतारीख विभिन्न असल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. 3 एप्रिल रोजी ईपीएफओने जारी केलेल्या सर्क्यूलरनुसार, ईपीएफओमध्ये असणारी चुकीची जन्मतारीख बदलण्यास आणि आधार क्रमांकाशी युएएन जोडण्याच्या नियमात सूट दिली आहे. त्यामुळे या बाबी तुम्ही 3 वर्षापर्यंत पूर्ण करू शकता.

जाहिरात
0506

खाते UAN शी लिंक असणे आवश्यक- त्याचप्रमाणे तुमचा खाते क्रमांक UAN (Universal Account Number) शी लिंक असणे गरजेचे आहे. असे नसल्यास पैसे मिळण्यामध्ये समस्या येऊ शकतात.

जाहिरात
0606

याशिवाय ईपीएफओ रेकॉर्डमध्ये असणारा IFSC क्रमांक देखील योग्य असणे गरजेचे आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या