JOIN US
मराठी बातम्या / मनी / टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क बनले सेल्समन! म्हणाले, 'माझं परफ्यूम खरेदी करा, मला ट्विटर खरेदी करायचंय'

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क बनले सेल्समन! म्हणाले, 'माझं परफ्यूम खरेदी करा, मला ट्विटर खरेदी करायचंय'

ट्विटर कंपनी खरेदीचा हा व्यवहार पहिल्यापासूनच चर्चेत होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या एका ताज्या ट्विटनंतर त्यांच्या ट्विटर कंपनीच्या खरेदीच्या व्यवहाराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदीचा प्रस्ताव पुन्हा एकदा पाठवला आहे. ट्विटर कंपनी 54.20 डॉलर प्रति शेअर या दरानं खरेदी करण्याचा हा प्रस्ताव आहे. एप्रिल महिन्यात 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर कंपtwनी खरेदीचा व्यवहार रद्द करण्याआधीच्याच किमतीचा हा प्रस्ताव आहे. ट्विटर कंपनी खरेदीचा हा व्यवहार पहिल्यापासूनच चर्चेत होता. आता त्यासाठी परफ्यूम विक्रीचा पर्याय त्यांनी शोधलाय. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आता परफ्यूम विकावं लागेल, असं मस्क यांनी ट्विटरवर लिहिलंय. ते खरेदी करण्याची विनंतीही त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना केली आहे. मस्क यांनी हे सगळं गमतीत म्हटलं असलं, तरी त्यांच्या फॉलोअर्सनी मात्र ते गांभीर्याने घेतलं आणि खरोखरच ब्रंट हेअर परफ्यूम विकत घेतली आहेत. “कृपया माझं परफ्यूम खरेदी करा, म्हणजे मी ट्विटर खरेदी करू शकेन,” असं मस्क यांनी ट्विटरवर लिहिलंय. या ट्विटला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘परफ्यूम सेल्समन’ - मस्क यांच्या ट्विटनंतर ब्रंट हेअर परफ्यूमची विक्री वाढली असल्याचं ‘बिझनेस टुडे’नं एका रिपोर्टमध्ये म्हटलंय. यामुळे मस्क यांनी ट्विटरवरच्या त्यांच्या ‘बायो’मध्ये बदल करून ‘परफ्यूम सेल्समन’ असं लिहिलंय. ब्रंट हेअर परफ्यूमची एक बाटली 8400 रुपयांना मिळते. बोरिंग कंपनीच्या वेबसाइटवरून ही बाटली ऑनलाइन खरेदी करता येऊ शकते. क्रिप्टोकरन्सी डॉज कॉइन देऊनही ही बाटली खरेदी करता येईल, असं मस्क यांनी म्हटलंय. भारतीयांकरिता त्यासाठी ‘गुगल पे’चा पर्याय देण्यात आलाय. परफ्यूमच्या 20 हजार बाटल्या विकल्या -   एलॉन मस्क यांच्या आवाहनानंतर जगभरात ब्रंट हेअर परफ्यूमच्या 20 हजार बाटल्या विकल्या गेल्या आहेत. त्यांची एकत्रित किंमत 82,272,400 रुपये आहे. ट्विटरचा वाद न्यायालयात -  एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा व्यवहार रद्द केल्यानंतर ट्विटर कंपनीने न्यायालयात धाव घेतली. आता 17 ऑक्टोबरपासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. मस्क यांच्या 44 अब्ज डॉलरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी ट्विटरच्या शेअरधारकांनी याआधीच मतदान केलं आहे. हेही वाचा -  विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज! सरकार वाढवणार एज्युकेशन लोनचं लिमिट, 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार कर्ज आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासोबतचं आपलं खासगी बोलणं सार्वजनिक होऊ नये, यासाठी मस्क यांना कोणत्याही परिस्थितीत ट्विटर कंपनी खरेदी करायची आहे, असं काहींचं म्हणणं आहे. आता या व्यवहाराबाबत न्यायालयात निर्णय होईलच. मात्र, तोवर ‘परफ्यूम सेल्समन’सारख्या गोष्टींमुळे ट्विटर खरेदीची चर्चा सुरू ठेवण्याची एलॉन मस्क यांची युक्ती लोकप्रिय होते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या