JOIN US
मराठी बातम्या / मनी / वाह रे Elon Musk! प्लँट टाकला चीनमध्ये आणि सवलत हवीय भारताकडून, राज्यं देतायत नवी ऑफर

वाह रे Elon Musk! प्लँट टाकला चीनमध्ये आणि सवलत हवीय भारताकडून, राज्यं देतायत नवी ऑफर

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे ई-व्हेईकल्स भारतीय बाजारात कधी येणार, हा प्रश्न कायम आहे. या विषयावरून मस्क सध्या केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जानेवारी: जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी (World’s biggest E vehicle company) टेस्लाच्या कार (Tesla Cars) भारतात कधी (India Market) मिळणार, असा सवाल नागरिक करू लागले आहेत. या प्रश्नांच्या आडून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारत सरकारवर (Government of India) दबाव आणायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. मात्र सरकार या दबावाला बळी पडत नसून केवळ मस्क यांच्या टेस्ला कंपनीसाठी वेगळा न्याय लावता येणार नाही, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे.   काय आहे प्रकरण? एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं बनवलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल्सना सध्या जगातील अनेक देशांमध्ये मागणी आहे. भारतातील नागरिकही या व्हेईकल्सची वाट पाहत आहेत. मात्र भारतातील सरकारी धोरणांमुळे ही प्रक्रिया रखडली असल्याचं सांगत मस्क यांनी सरकारी प्रक्रियेवर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कंपनीची वाहनं भारतात विकण्यासाठी आपण तयार आहोत, मात्र त्यावरील आयात शुल्क कमी करण्यात यावं, अशी मागणी मस्क यांनी केली आहे. मात्र आयात शुल्कात सवलत द्यायला केंद्र सरकार तयार नाही.   काय आहे कारण? टेस्ला कंपनीनं भारतात त्यांच्या वाहनांचं उत्पादन घ्यावं आणि इथून त्या गाड्या इतर देशांत निर्यात कराव्यात, अशी ऑफर केंद्र सरकारनं दिली आहे. मस्क यांना आयात शुल्कात सवलत देणं ही भारतात अगोदरपासून गुंतवणूक केलेल्या आणि भारतात उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांवर अन्याय ठरणार आहे. याचा जागतिक पातळीवर वेगळा संदेश जाईल आणि भारतातील परकीय गुंतवणुकीवर परिणाम होईल, असं केद्र सरकारचं मत आहे.   हे वाचा -

राज्य सरकारांकडूनही ऑफर आपल्या राज्यात येऊन एलॉन मस्क यांच्या कंपनीनं आपला प्लँट उभा करावा, अशी ऑफर आतापर्यंत महाराष्ट्र, पंजाब आणि तेलंगणानं दिला आहे. मात्र त्यावर मस्क यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही. मस्क सध्या चीनमधून त्यांच्या कारचं उत्पादन करत आहेत. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या