JOIN US
मराठी बातम्या / मनी / e-Passport: ई-पासपोर्ट म्हणजे काय? तो कुठे वापरता येतो? वाचा डिटेल्स

e-Passport: ई-पासपोर्ट म्हणजे काय? तो कुठे वापरता येतो? वाचा डिटेल्स

e-passport benefits: ई-पासपोर्ट हा नेहमीच्या पासपोर्टपेक्षा थोडा वेगळा असतो. त्यात वापरकर्त्याची आवश्यक माहिती तसेच बायोमेट्रिक माहितीही असते.

जाहिरात

ई-पासपोर्ट म्हणजे काय? तो कुठे वापरता येतो? वाचा डिटेल्स

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई**, 31** जुलै: भारतात बहुतांश आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन झाली आहेत, ई-आधार कार्ड, ई-पॅन कार्ड देखील वापरलं जात आहे. त्याचबरोबर भारतात ई-पासपोर्ट (e-passport) आणण्याची तयारी सुरू असून, यंदाच्या अर्थसंकल्पात तो जारी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्या मते, भारतीय नागरिक नजीकच्या भविष्यात सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह ई-पासपोर्ट (e-passport benefits) वापरू शकतात. ई-पासपोर्ट म्हणजे काय? ई-पासपोर्ट नेहमीच्या पासपोर्टपेक्षा थोड वेगळा असतो. त्यात वापरकर्त्याची आवश्यक माहिती तसेच बायोमेट्रिक ओळखही असते. यासोबतच यामध्ये एक चिप प्रणाली आहे, ज्यामध्ये पासपोर्ट वापरकर्त्यांची माहिती असते. चिप असल्यामुळे पासपोर्टबाबत कोणतीही फसवणूक होणार नाही, असं सांगण्यात येत आहे. तथापि, हा पासपोर्ट सामान्य पासपोर्टमधील इतर माहितीपेक्षा वेगळा असणार नाही. ई-पासपोर्टचे फायदे-

ई-पासपोर्टची वैशिष्ट्ये- परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ई-पासपोर्टमध्ये 41 सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. अर्जदाराच्या वयानुसार तो 5 किंवा 10 वर्षांसाठी वैध आहे. त्यात लॅमिनेटेड होलोग्राफिक प्रतिमा आहेत. यात वापरकर्त्याची माहिती, बायोमेट्रिक माहिती, 10 बोटांचे ठसे, बुबुळ स्कॅन, रंगीत छायाचित्र आणि डिजिटल स्वाक्षरी असते. हेही वाचा-  ITR दाखल करण्याची तारीख 31 जुलैच्या पुढे वाढवली जाईल का? आयकर विभागानं केलं महत्त्वाचं ट्वीट ई-पासपोर्टचा वापर- तुम्ही परदेशात प्रवास करण्यासाठी तसेच ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि सरकारी कागदपत्रांसाठी ई-पासपोर्ट वापरू शकता. ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा? भारतात ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी, पासपोर्ट सेवा वेबसाइटला भेट द्या आणि Register Nowवर क्लिक करा किंवा तुमच्या सध्याच्या आयडीने लॉग इन करा. आता “Apply for New Passport” किंवा “Re-issue of Passport” वर क्लिक करा. त्यानंतर मागितलेली सर्व माहिती द्या. आता पेमेंट करण्यासाठी “पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट” वर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पावती जतन करा. ई-पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे- या पत्त्याच्या पुराव्यासाठी, ओळखपत्र, जन्मतारीख पुरावा, मूळ पासपोर्ट, पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पृष्ठाची प्रत, ओवरव्‍यू पेज आणि ईसीआर किंवा नॉन-ईसीआर पेज आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या