GST
नवी दिल्ली : बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो किंवा महागड्या कॅफेत जाऊन खात असतो. तिथे खाऊन झालं की बिल डिटेलमध्ये न बघता रक्कम भरुन मोकळे होतो. पण अशा सवयीमुळे तुम्ही स्वत:चं नुकसान करुन घेत आहात. तुम्हाला माहिती आहे का खाद्यपदार्थांच्या बिलावर तुमच्याकडून किती टक्के GST आकारला जातो? ते आकारणं बंधनकारक आहे की नाही यापेक्षा तुम्ही तो भरणं आवश्यक आहे की नाही हे आज जाणून घेणार आहोत. प्रत्येक रेस्टॉरंट तुमच्याकडून फूड बिलावर जीएसटी आकारू शकत नाही. तसेच तुम्हाला जीएसटीच्या स्वरूपात अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. त्यांना हे करण्याची गरज नाही कारण ते सरकारच्या विशेष योजनेत बसतात. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक रेस्टॉरंट, कॅफेला वार्षिक उलाढालीवरच GST भरावा लागतो. जीएसटीचा हा दर सामान्य दरापेक्षा कमी आहे. दीड कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेला छोटा व्यावसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
तुमच्या बँकेतील व्यवहारावर सरकारची नजर, एक चूकही पडू शकते महागातजी रेस्टॉरंट्स सरकारच्या जीएसटी कंपोझिशन स्कीमचा लाभ घेत आहेत, ते रेस्टॉरंटमध्ये बनवलेल्या फूड बिलावर ग्राहकांकडून जीएसटी वसूल करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटचे बिल भरता तेव्हा एकदा तपासा की रेस्टॉरंट कंपोझिशन स्कीम घेतल्यानंतरही तुमच्याकडून जीएसटी बेकायदेशीरपणे आकारलं जातं की नाही. जर अशा पद्धतीनं तुमच्याकडून जर कोणी अतिरिक्त पैसे घेत असेल तर तुम्ही तक्रार करु शकता. जे या योजनेत बसतात त्यांना बिलावर “composition taxable person, not eligible to collect tax on supplies” हे वाक्य लिहिणं बंधनकारक आहे. त्यावर GST लावता येणार नाही.
केंद्राची मोठी घोषणा, राज्यांना 5 वर्षांचा जीएसटी परतावा मिळणारGST पोर्टल https://www.gst.gov.in/ वर जा. Search Taxpayer वर क्लिक करा. Search Composition Taxpayer वर क्लिक करा. रेस्टॉरंटच्या बिलावर लिहिलेला GST क्रमांक टाका. असे केल्याने, हे रेस्टॉरंट नियमित जीएसटी भरणारे आहे की कॉम्पोजिट पैसे देणारे आहे हे कळेल. जर ते कॉम्पोजिट जोड असेल, तर बिलामध्ये जोडलेले GST शुल्क भरू नका. जर रेस्टॉरंटने बिलामध्ये जबरदस्तीने जीएसटी आकारला असेल, तर तुम्ही https://gstcouncil.gov.in/grievance-redressal-committee-grc लिंकवर जाऊन ते ऑनलाइन करू शकता.