JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Transaction रद्द झाल्यावर पैसे परत न आल्यास करा हे काम, बँक रोज देईल 100 रुपये नुकसान भरपाई

Transaction रद्द झाल्यावर पैसे परत न आल्यास करा हे काम, बँक रोज देईल 100 रुपये नुकसान भरपाई

काय तुमच्याबरोबर असे कधी झाले आहे की बँकेचे ट्रान्झॅक्शन फेल झाले आणि पैसे परत नाही आले. तर घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही बँकेमध्ये यासंदर्भात तक्रार करू शकता. वाचा सविस्तर

019

अशावेळी खात्यामधून वजा झालेली रक्कम बँकां त्वरीत परत करतील अशी अपेक्षा असते. जर तक्रार केल्यानंतर सात दिवसांच्या आतमध्ये ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर कार्ड जारी करणाऱ्या बँकांंना रोज 100 रुपयाच्या हिशोबाने भरपाई द्यावी लागू शकते.

जाहिरात
029

फेल ट्रान्झाक्शनबाबत आरबीआयचे नियम 20 सप्टेंबर 2019 पासून लागू झाले आहेत.

जाहिरात
039

मनीकंट्रोलच्या वृत्तीनुसार हा नियम बँकांव्यतिरिक्त एनबीएफसी साठीदेखील लागू होतो. हा नियम कम्यूनिकेशन लिंक फेल झाल्यानंतर, एटीएममध्ये कॅश नसल्यास, टाइम आउट सेशन झाल्यास देखील लागू होतो. अन्य बँकांच्या एटीएममध्ये ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास देखील हा नियम लागू होतो

जाहिरात
049

तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएममध्ये किंवा दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये कार्डचा वापर केला, आणि खात्यातून पैसे कापले गेले पण तुमच्या हातात पैसे आले नाही तर कार्ड जारी करणाऱ्या बँकेत तक्रार द्या

जाहिरात
059

नियमानुसार बँकेच्या एटीएम बॉक्सवर संबंधित ऑफिसरचे नाव आणि टेलीफोन नंबर/टोल फ्री नंबर/हेल्थ डेस्क नंबर डिस्प्ले करणे गरजेचे आहे.

जाहिरात
069

ट्रान्झॅक्शन फेल होऊनही पैसे कापले गेल्यास 7 दिवसांच्या आतमध्ये पैसे क्रेडिट होणे अपेक्षित असते. तक्रार दाखल केल्यानंतर 7 दिवस मोजले जातात

जाहिरात
079

सात दिवसांच्या आतमध्ये पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये क्रेडिट नाही झाले तर बँकेला या विलंबासाठी रोज 100 रुपये भरपाई द्यावी लागेल. ही रक्कम त्यांना कोणत्याही अटीशिवाय ग्राहकांच्या खात्यामध्ये टाकावी लागेल.

जाहिरात
089

जरी ग्राहकांनी क्लेम केले नसेल तरी ही रक्कम द्यावी लागेल. मात्र ग्राहकांना तेव्हाच ही रक्कम मिळेल, जर व्यवहार फेल झाल्याची तक्रार 30 दिवसांच्या आत केली.

जाहिरात
099

वेळेत या तक्रारीचे निरसन न झाल्यास ग्राहक 30 दिवसांच्या आतमध्ये बँकिंग ओम्बड्समेनकडे तक्रार करू शकता. बँक उत्तर देत नसेल किंवा बँकेच्या उत्तरामुळे तुम्ही समाधानी नसाल तर बँकिंग ओम्बड्समेनकडे तक्रार करता येईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या