JOIN US
मराठी बातम्या / मनी / इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये आहे 'हा' फरक; कशात गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं?

इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये आहे 'हा' फरक; कशात गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं?

आज आम्ही तुम्हाला इक्विटी व्यतिरिक्त इतर डेट म्युच्युअल फंडांबद्दल माहिती देणार आहोत. त्यावरून ‘इक्विटी म्युच्युअल फंड’ आणि ‘डेट म्युच्युअल फंड’ या पैकी गुंतवणुकीचा चांगला पर्याय कोणता? हे ठरवणं तुम्हाला सोपं होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 ऑक्टोबर : म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा असा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला समान मालमत्तेच्या पूलमध्ये पैसे गुंतवता येतात. उदाहरणार्थ, इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे स्टॉकमध्ये गुंतवले जातात. तुम्ही ज्या म्युच्युअल फंड कंपनीला गुंतवणुकीसाठी पैसे देता, ती तुमचा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रांतील आणि मार्केट कॅपमधील निवडक शेअर्समध्ये गुंतवते. तुमच्या गुंतवणुकीचा काही भाग त्या पूलमधील प्रत्येक शेअरमध्ये विभागला जातो. त्याचप्रमाणे, इतर मालमत्ता कंपन्यांचेसुद्धा म्युच्युअल फंड असतात. आज आम्ही तुम्हाला इक्विटी व्यतिरिक्त इतर डेट म्युच्युअल फंडांबद्दल माहिती देणार आहोत. त्यावरून ‘इक्विटी म्युच्युअल फंड’ आणि ‘डेट म्युच्युअल फंड’ या पैकी गुंतवणुकीचा चांगला पर्याय कोणता? हे ठरवणं तुम्हाला सोपं होईल. डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अधिक सुरक्षित कॉर्पोरेट बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज किंवा ट्रेझरी बिलांमध्ये गुंतवले जातात. यामध्ये तुम्हाला किती रिटर्न मिळतील, याची कल्पना काही प्रमाणात आधीच आलेली असते. चला तर, आता तुमच्यासाठी कोणता गुंतवणुकीचा पर्याय चांगला आहे, ते जाणून घेऊ. EPS Rules: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांनाही मिळेल पेन्शन, गॅप पडला तरीही मिळेल लाभ, वाचा डिटेल्स इक्विटी म्युच्युअल फंड यामध्ये तुमचे पैसे हे शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लावले जातात. त्यामुळे या म्युच्युअल फंडात मिळणारे रिटर्न जास्त असतात. मात्र, त्याचा धोकाही तितकाच जास्त आहे. जर तुम्ही स्मॉलकॅप किंवा मिडकॅप म्युच्युअल फंडावर मिळणारे रिटर्न लक्षात घेतले, तर ते दीर्घकालीन डेट म्युच्युअल फंडात मिळणाऱ्या रिटर्नच्या तुलनेत अनेकपटीनं जास्त असू शकतात. हे फंड मार्केटमधील अनुभवी व्यक्तींकडून व्यवस्थापित केले जात असल्याने, जोखीम थोडी कमी आहे. परंतु, शेअर बाजार विशेषत: स्मॉलकॅप स्टॉक्स खूप अनिश्चित आहेत. अशा परिस्थितीत जर तुमच्यात जोखीम घेण्याची क्षमता असेल, तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सर्व पैसे एकाच शेअरमध्ये गुंतवले जात नाहीत. तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या शेअर्समध्ये विभागली जाते. त्यामुळे एक शेअर जरी पडला तरी दुसरा त्याची भरपाई करू शकतो. येथे तुम्हाला रिस्क ॲडजेस्टेड रिटर्न मिळतील. बँक बाझारचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या मते, ‘इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी. यात अल्प किंवा मध्यम मुदतीची गुंतवणूक केल्यास जोखीम जास्त असते.’ फायद्याची बातमी, ICICI बँकेने वाढवले FD चे दर, ‘या’ तारखेपासून होणार लागू डेट म्युच्युअल फंड डेट म्युच्युअल फंडात तुमचे पैसे कंपन्यांना किंवा सरकारला कर्ज देण्यासाठी वापरला जातो. म्हणूनच ते अधिक सुरक्षित मानले जातात. यावर तुम्हाला किती रिटर्न मिळेल, याचा अंदाज कंपनी किंवा सरकार तुम्हाला आधीच देतं. यात थोडाफार फरक असू शकतो. येथे तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडांपेक्षा कमी दराने रिटर्न मिळतात, परंतु पैसे अधिक सुरक्षित असतात. जर तुमच्याकडे जास्त जोखीम घेण्याची क्षमता नसेल, तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडणं जास्त फायद्याचं ठरेल. असा आकारला जातो टॅक्स इक्विटी म्युच्युअल फंडांवर 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत झालेला नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जातो, आणि त्यावर 15 टक्के टॅक्स आकारला जातो. तर 1 वर्षानंतर कमवलेल्या नफ्याला दीर्घकालीन भांडवली नफा म्हणतात, ज्यावर 10 टक्के टॅक्स आकारला जातो. दुसरीकडे, डेट इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत कमवलेल्या नफ्याला अल्पकालीन नफा म्हणतात. हा तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नात जोडला जातो, व त्या उत्पन्नाच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. तर तीन वर्षानंतर मिळणाऱ्या म्हणजेच दीर्घकालीन नफ्यावर इंडेक्सेशन लाभासह 20 टक्के टॅक्स आकारला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या