JOIN US
मराठी बातम्या / मनी / कच्च्या तेलाच्या किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होईना? हे आहे महत्त्वाचं कारण

कच्च्या तेलाच्या किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, तरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होईना? हे आहे महत्त्वाचं कारण

गेल्या आठवड्यात कच्च्या तेल प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आले. तेव्हापासून, ते प्रति बॅरल 92.84 वर काही नफ्यासह व्यापार करत आहे, जे सहा महिन्यांच्या नीचांकी आहे. पेट्रोलियमच्या दरात बदल न करण्याच्या प्रश्नावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. साहजिकच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं वाटतं होतं. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याचे कारण म्हणजे खर्चात वाढ होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ न केल्याने सुमारे पाच महिने तोटा सहन करावा लागत आहे. मंदीच्या भीतीने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून प्रथमच आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड गेल्या आठवड्यात प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आले. तेव्हापासून, ते प्रति बॅरल 92.84 डॉलरवर काही नफ्यासह व्यापार करत आहे, जे सहा महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहे. किरकोळ किमतीत कोणताही बदल नाही रशियाने नॉर्थ स्ट्रीम पाइपलाइन बंद करण्याचा निर्णय घेतला आणि क्रूड ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC+) आणि त्याच्या सहयोगी देशांनी (OPEC+) उत्पादनात कपात केल्यानंतरही किमतीत घसरण झाली. मात्र, यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत बदल झालेला नाही. विक्रमी 158 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदललेल्या नाहीत. वाचा - महिन्याला 10 हजाराच्या SIP चे रूपांतर 5 वर्षात 12 लाखात करणारे 3 म्युच्युअल फंड कंपन्या तोटा भरून काढतायेत पेट्रोलियमच्या किमतीत बदल न करण्याच्या प्रश्नावर, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय किमती वाढल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना दर न वाढवल्यामुळे तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे आता या कंपन्या किमती कमी करत नाहीत. “जेव्हा आंतरराष्ट्रीय किमती जास्त होत्या, तेव्हा आमच्या (पेट्रोल आणि डिझेल) किमती आधीच कमी होत्या. “आम्ही आमचे सर्व नुकसान भरून काढले आहे का?”, वास्तविक, 6 एप्रिलपासून दर स्थिर ठेवल्याने झालेल्या नुकसानाबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. क्रूडच्या किमतीत चढ-उतार भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत 8 सप्टेंबरला प्रति बॅरल 88 डॉलर इतकी होती. एप्रिलमध्ये त्याची सरासरी प्रति बॅरल 102.97 डॉलर आणि त्यानंतरच्या महिन्यात 109.51 प्रति बॅरल होती. जूनमध्ये ते प्रति बॅरल 116.01 डॉलरवर पोहोचले होते. जुलै महिन्यापासून आंतरराष्ट्रीय किमतीत घसरण सुरू झाली. त्यावेळी भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 105.49 डॉलरवर आली होती. ऑगस्टमध्ये ते 97.40 डॉलर प्रति बॅरल आणि सप्टेंबरमध्ये 92.87 प्रति डॉलर बॅरल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या