JOIN US
मराठी बातम्या / मनी / Crude Oil : कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षातील सर्वोच्च पातळीवर, किंमत 100 डॉलर जवळ

Crude Oil : कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षातील सर्वोच्च पातळीवर, किंमत 100 डॉलर जवळ

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आहेत आणि युक्रेनच्या संकटामुळे तेलाच्या बाजारपेठेतील आधीच वाढलेल्या मागणीत भर पडू शकते. कोरोना महामारीचा वेग थांबल्यानंतर जगातील सर्व देशांमध्ये तेलाची मागणी वाढली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 फेब्रुवारी : रशिया-युक्रेन संकटामुळे (Russia-Ukrain Conflict) एकीकडे शेअर बाजाराची स्थिती बिकट आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची (Crude Oil Price) किंमत प्रति बॅरल 99.38 डॉलरवर पोहोचली, जी सप्टेंबर 2014 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. रशियाने पूर्व युक्रेनच्या दोन भागांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे आणि त्यांच्या संरक्षणाखाली आपले सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या संकटाच्या तीव्रतेमुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 2014 पासूनची सर्वोच्च पातळी एक दिवस आधी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 95 डॉलरच्या आसपास होती. आज संध्याकाळपर्यंत ब्रेंट क्रूड ऑईल 3.7 टक्क्यांनी वाढून 98.87 डॉलरवर व्यापार करत होते. अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड देखील 4.8 टक्क्यांनी वाढून 95.48 डॉलरवर पोहोचला आहे. डे ट्रेडिंगमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल 96 डॉलरपर्यंत पोहोचली होती, जी 2014 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. Investment Tips : सीनियर सिटिजन्ससाठी या बँकांमध्ये खास सुविधा, सुरक्षेसह मिळेल अधिकचे व्याज युद्धाचं संकट कायम अमेरिका आणि त्याचे युरोपीय मित्र देश रशियावर नवीन निर्बंध जाहीर करण्यास तयार आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन वेगळ्या भागात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर ब्रिटन रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादणार असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी सांगितले. जॉन्सन म्हणाले, निर्बंध केवळ डोनबास आणि लुहान्स्क आणि डोनेस्तक येथील संस्था लक्षात घेऊनच लादले जाणार नाहीत तर रशिया देखील त्याच्या कक्षेत असेल. आम्ही शक्य तितक्या रशियाच्या आर्थिक हितांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे वाढू शकतात तेल एजंट PVM चे तमास वर्गा म्हणाले, प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर जाण्याच्या शक्यतांनी मोठी चालना दिली आहे. अशा रॅलीवर बिड लावणाऱ्यांना तणाव वाढण्याची भीती आहे. युरोपियन युनियन देशांचे परराष्ट्र मंत्रीही मंगळवारी रशियावर निर्बंध लादणार आहेत. युनियनच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेप बोरेल यांनी ही माहिती दिली. Upcoming IPO : पुढील महिन्यात कमाईची मोठी संधी, 8 आयपीओ येणार; चेक करा डिटेल्स कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आहेत आणि युक्रेनच्या संकटामुळे तेलाच्या बाजारपेठेतील आधीच वाढलेल्या मागणीत भर पडू शकते. कोरोना महामारीचा वेग थांबल्यानंतर जगातील सर्व देशांमध्ये तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे आधीच पुरवठ्याच्या पातळीवर काही समस्या असल्याने त्याचे भाव वाढत होते. रशिया जगातील दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश युक्रेनच्या संकटाने कच्च्या तेलाच्या पुरवठा-संबंधित समस्यांमध्ये भर घातली आहे. सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे आणि त्याच वेळी तो नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तेल बाजारातील रशियाचे वर्चस्व केवळ पुरवठा संकटाची भीती निर्माण करत आहे. जर रशियावर निर्बंध लादले गेले तर तेथून तेल आणि वायूचा पुरवठा होणार नाही. यामुळे तेल बाजारात कमी होईल आणि पर्यायाने त्याची किंमत वाढेल. या सगळ्यात तेलाचा पुरवठा अधिक वेगाने वाढवण्याच्या मागणीला OPEC+ या पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना आणि सहयोगी संघटनांनी विरोध केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या