क्रेडिट कार्डची लिमिट वाढवावी की अपग्रेड करावं?
मुंबई, 14 मे: फायनेंशियल बॅकअपसाठी क्रेडिट कार्ड हे फायदेशीर टूल आहे. क्रेडिट कार्ड कोणत्याही लक्झरी शॉपिंगपासून ते तुमच्या मेडिकल इमरजेंसीपर्यंत उपयुक्त आहे. पण काही वेळा आपल्या गरजा क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा जास्त होतात. अशा वेळी हे परवडणारे असेल, तर आपण क्रेडिट कार्ड लिमिट वाढवणे किंवा कार्ड अपग्रेड करण्याचा ऑप्शन निवडू शकतो. बँका तुम्हाला तुमच्या सध्याच्या कार्डची मर्यादा वाढवण्याची सुविधा देतात. यासोबतच तुम्हाला अपग्रेडेड कार्डही मिळतील. परंतु तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्ड लिमिट वाढवणं किंवा अपग्रेड करणे फायदेशीर आहे की नाही हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
क्रेडिट कार्ड लिमिटचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या कार्डवर एका लिमिटेड रकमेपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. या लिमिटपर्यंत खर्च करण्यासाठी तुम्हाला कोणताही दंड किंवा अॅडिशनल चार्ज द्यावे लागत नाही. क्रेडिट लिमिट वाढवता येते. म्हणजेच, तुम्ही बँकेला तुमच्या कार्डची मर्यादा वाढवण्यास सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच कार्डवर अधिक क्रेडिट मिळू शकेल. तर ज्यावेळी कार्ड अपग्रेड करता, तेव्हा तुम्हाला एखादी खास गरज लक्षात घेऊन आपलं कार्ड अपड्रेड करावं लागतं. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे कार्ड कोणत्याही रिवॉर्ड पॉइंट, प्रमोशन किंवा ऑफरसाठी अपग्रेड करता. म्हणजेच तुम्हाला या अतिरिक्त ऑफर एकाच कार्डवर मिळू लागतात.
FD करण्याचे आहेत 9 नुकसान, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा वाचाच!क्रेडिट कार्ड लिमिट वाढवणे आणि अपग्रेड करणे यात मोठा फरक आहे. तुम्हाला फक्त एका खास ऑफरची गरज आहे असे वाटत असल्यास, तुम्ही अपग्रेडसाठी जाऊ शकता. मात्र जर तुम्हाला तुमचा खर्च कव्हर करायचा असेल तर क्रेडिट लिमिटचा ऑप्शन योग्य राहील. वाढलेल्या क्रेडिट मर्यादेसह, तुम्हाला अधिक क्रेडिट मिळेल. या लिमिटचा तुम्ही इमरजेंसीमध्ये फायदा घेऊ शकता. अपग्रेड करताना प्रॉब्लम असा होतो की, तुम्हाला त्यावर एक्स्ट्रा ऑफर मिळू शकतात, परंतु लिमिट तिच राहील. अशा वेळी तुम्हाला यामधून खर्च कव्हर करण्यात मदत मिळणार नाही.
‘या’ सरकारी बँकेने वाढवले व्याजदर, FD वर मिळतंय जास्त रिटर्न, आता किती होणार फायदा?यासोबतच तुम्ही जास्त ऑफर्ससाठी एक्स्ट्रा क्रेडिट कार्ड घेतल्यास, तुमचे बजेट बिघडू शकते. तुमच्यासाठी अनेक प्रकारचे पेमेंट ट्रॅक करणं, क्रेडिट स्कोअर मेंटेन करणं, इंट्रेस्ट भरणं खूप गरजेचं असतं. अनेक कार्ड ठेवण्यापेक्षा तुम्ही एकच कार्ड ठेवा.