JOIN US
मराठी बातम्या / मनी / क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर

क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर

क्रेडिट युटिलायझेशन रेशो आणि क्रेडिट कार्ड स्कोअर यांच्यात नकारात्मक संबंध आहे. म्हणजेच, जसजसा क्रेडिटचा वापर वाढतो, क्रेडिट स्कोअर कमी होतो. विशेष म्हणजे क्रेडिट स्कोअरमध्ये त्याचा वाटा 30 टक्के आहे.

जाहिरात

क्रेडिट कार्ड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्तीसाठी क्रेडिट स्कोअरचे (Credit Score) महत्त्व वाढले आहे. यावरून तुम्हाला किती व्याजदरावर किती कर्ज मिळेल हे ठरते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर बँका तुम्हाला कर्ज देण्यापासून लांब राहतील आणि त्यांनी दिले तरी जास्त व्याजाने देतील. कमी क्रेडिट स्कोअरची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक क्रेडिट युटिलायझेशन रेशो (Credit Utilization Ratio) आहे. पैसा बाजारातून (Paisa Bazaar) मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वेळा क्रेडिट कार्डचा ईएमआय आणि कर्जाचा हप्ता वेळेवर भरल्यानंतरही क्रेडिट स्कोअर कमी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. क्रेडिट युटिलायझेशन रेशो आणि क्रेडिट कार्ड स्कोअर यांच्यात नकारात्मक संबंध आहे. म्हणजेच, जसजसा क्रेडिटचा वापर वाढतो, क्रेडिट स्कोअर कमी होतो. विशेष म्हणजे क्रेडिट स्कोअरमध्ये त्याचा वाटा 30 टक्के आहे. त्यामुळे स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे. अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी अर्थ मंत्रालयातर्फे आजपासून ‘अर्थशास्त्री’ उपक्रम; सोशल मीडियावर होणार क्लास? क्रेडिट युटिलायझेशन रेशो कसे ठरवले जाते हे तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण मर्यादा आणि खर्चाचे प्रमाण आहे. चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी हे प्रमाण जास्तीत जास्त 30 टक्के असावे. यापेक्षा जास्त असता कामा नये. समजा, तुमच्या क्रेडिट कार्डची एकूण मर्यादा एक लाख रुपये आहे आणि तुम्ही दरमहा 25 हजार रुपये खर्च करत असाल, तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन 25 टक्के आहे. जास्त खर्च केल्यास क्रेडिट लिमिट वाढवा किंवा दुसरे कार्ड घ्या पैसा बाजार नुसार, हे प्रमाण 30 टक्क्यांच्या खाली ठेवा कारण तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये क्रेडिट युटिलायझेशन महत्त्वाची भूमिका बजावते. तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवा किंवा तुमच्या क्रेडिट कार्डचा खर्च जास्त असल्यास दुसऱ्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा. तुम्ही यापेक्षा जास्त खर्च केला तरीही तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो चांगले होईल. शेअर बाजाराची चाल ‘या’ आठवड्यात कशी असेल? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे? या कारणांमुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो » जर तुम्ही कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी मर्यादित कालावधीत पुन्हा पुन्हा अर्ज करत असाल तर यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्येही घट होते. » जर तुम्ही तुमच्या गॅरंटीवर एखाद्याला कर्ज दिले आणि त्याने वेळेवर पेमेंट केले नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. » एक-दोन महिन्यात जास्त खर्च होत असल्यास क्रेडिट कार्डची मर्यादा वारंवार वाढवू नका. खर्च मध्यम ठेवणे चांगले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या