JOIN US
मराठी बातम्या / मनी / CNG आणि PNG चे दर कमी होणार? सरकार लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत

CNG आणि PNG चे दर कमी होणार? सरकार लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत

गॅसवर आधारित खत ऊर्जा प्रकल्प आणि सीएनजी पीएनजी ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

जाहिरात

पेट्रोल-डिझेल की सीएनजी?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रतिनिधी अलोक प्रियदर्शनी, नवी दिल्ली : दिवाळीनंतर वाढलेल्या महागाईतून ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती CNBC ने दिली आहे. गॅसवर आधारित खत ऊर्जा प्रकल्प आणि सीएनजी पीएनजी ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ग्राहकांसाठी योग्य किंमत ठरवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतं. याबाबत किरीट पारीख समितीचा अहवाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी अपेक्षा आहे. या अहवालात, ग्राहकांसाठी समिती गॅसची किंमत 6-7 डॉलर / एमएमबीटीयू करण्याची शिफारस करू शकते. सप्टेंबर महिन्यात सरकारने नैसर्गिक वायूची योग्य किंमत ठरवण्यासाठी समिती स्थापन केली होती.

जगाची मंदीच्या दिशेनं वाटचाल, तुमच्यावर कसा होणार परिणाम? सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर

आता काय होणार? ३१ ऑक्टोबर रोजी समितीने अंतिम रिपोर्ट फाइल करण्यासाठी बैठक बोलवली आहे. शेअर होल्डर्सची ही बैठक असणार आहे. रिपोर्ट दोन भागांत असणार आहे. यामध्ये फर्टिलायझर आणि पावर प्लांटसोबत CGD साठी वेगळी शिफारस करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून सरकारने गॅस निर्मिती करण्यासाठी समिक्षा केली. त्यानंतर ४० टक्क्यांनी किंमत वाढवली होती.

कशा कमी होणार किंमती? या शिफारशीच्या आधारे शहरातील गॅस वितरण कंपन्यांना ओएनजीसीसारख्या गॅस उत्पादकांकडून सवलतीच्या दरात गॅस मिळणार आहे. याच कारणामुळे आयजीएलसारख्या सीजीडी कंपन्या सीएनजी पीएनजीची किंमत कमी करू शकतील.

दिवाळीनंतरही सोन्याचे दर चढेच राहणार? काय सांगतोय बाजाराचा मूड

कसे ठरवले जाणार दर केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर आणि मार्चमध्ये नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करते. अमेरिका, कॅनडा आणि रशियासारख्या वायूसाठा असलेल्या देशांच्या गेल्या एक वर्षाच्या दरांच्या आधारे ही किंमत एक तिमाहीच्या अंतरानुसार निश्चित केली जाते.

अशा परिस्थितीत १ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील गॅसची किंमत जुलै २०२१ ते जून २०२२ या कालावधीतील किमतीच्या आधारे ठरविण्यात येणार आहे. त्यावेळी गॅसचे दर उच्च पातळीवर होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या