मुंबई, 25 एप्रिल : बँका (Banks) किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून (Financial Institution) कर्ज घेताना सर्वांत आधी कर्जदाराचा CIBIL स्कोअर (CIBIL score ) पाहिला जातो. हा स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. स्कोअर जितका जास्त असेल तितका कर्ज मिळण्यासाठी हिताचं ठरतं. साधारणपणे, 750 वरील स्कोअर चांगला मानला जातो आणि स्कोअर तेवढा असल्यास कर्ज मंजूर (Loan Approval) होण्याची शक्यता जास्त असते. चांगले CIBIL स्कोअर असलेल्यांनाच बँका कर्ज मंजूर करतात किंवा क्रेडिट कार्ड जारी करतात. CIBIL रिपोर्टमध्ये स्कोअर आणि इतर क्रेडिट डिटेल्स असतात. CIBIL रिपोर्ट तपासल्यानंतर कर्जदार त्या कर्जाची परतफेड करू शकतील की नाही, हे कर्ज देणाऱ्या संस्था निश्चित करतात. सिबिल स्कोअर हा सबंधित व्यक्तीच्या क्रेडिट रिस्क प्रोफाइलची (Credit Risk Profile) एक झलक असतो, ज्याच्या आधारावर बँक कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय घेतात. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर चांगला असणं का महत्त्वाचं आहे. चांगल्या CIBIL स्कोअरचा फायदा काय आहे ते जाणून घेऊयात. स्वस्त कर्ज: बँका कर्जदारांच्या रिस्क प्रोफाइलवर आधारित कर्जावर व्याजदर देतात. कर्जदाराचा CIBIL स्कोअर चांगला असल्यास, बँका कमी स्कोअर असलेल्यांच्या तुलनेत कमी व्याजदर (Lower Rate of Interest) देऊ शकतात. Multibagger Share: चार महिन्यात 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांवर, एक लाखांची गुंतवणूक बनली 35 लाख कर्ज लवकर मंजूर होतं : ज्यांचे क्रेडिट स्कोअर चांगले आहेत, त्यांना कर्ज लवकर मिळतं. तसंच CIBIL स्कोअर चांगले असलेल्यांना वित्तीय संस्थाही सहजपणे कर्ज मंजूर करतात. क्रेडिट लिमिट जास्त : बँकांकडून मोठी कर्जं घेण्यासाठी चांगला सिबिल स्कोअर आवश्यक असतो, कारण त्यात जास्त जोखीम असते. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला कमी स्कोअर असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त कर्ज किंवा जास्त क्रेडिट मर्यादा मिळू शकते. Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही… प्री-अप्रूव्ह्ड लोन: तुमचा सिबिल स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला तुमच्या बँकेकडून प्री अप्रूव्ह्ड लोन किंवा क्रेडिट कार्ड दिलं जाऊ शकतं. दोन वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. अधिक चांगल्या फायद्यांसह कार्ड : क्रेडिट आणि डेबिट कार्ड काही फायदे आणि पुरस्कारांसह येतात. ज्यांचा क्रेडिट परतफेडीचा इतिहास (Credit Repayment History) चांगला आहे आणि त्यामुळे चांगला CIBIL स्कोर आहे, अशी प्रोफाईल असणाऱ्या लोकांना बँका अधिक चांगले फायदे आणि बक्षीसं (Benefits and Rewards) देतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2017 मध्ये देशातील सर्व क्रेडिट ब्युरोसाठी प्रत्येक कॅलेंडर वर्षात एक फ्री डिटेल क्रेडिट रिपोर्ट (Free Detailed Credit Report) देणं अनिवार्य केलं असून, ते CIBIL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. PWC च्या अहवालानुसार, भारतात क्रेडिट कार्ड जारी करण्याचं प्रमाण गेल्या चार वर्षांत 20 टक्क्यांच्या वार्षिक दराने मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. क्रेडिट कार्डधारकांची संख्या मार्च 2017 मध्ये 29 मिलियनवरून मार्च 2021 मध्ये 62 मिलियन झाली. 2019 आणि 2020 मध्ये ती अनुक्रमे 26 आणि 23 टक्क्यांनी वाढली आहे.