JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Changes from 1 October 2021: 1 ऑक्टोबरपासून बदलणार महत्त्वाचे आर्थिक बदल, LPG ते ऑटो डेबिटचे नियम बदलणार

Changes from 1 October 2021: 1 ऑक्टोबरपासून बदलणार महत्त्वाचे आर्थिक बदल, LPG ते ऑटो डेबिटचे नियम बदलणार

1 ऑक्टोबरपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल (changes from 1 October 2021) होणार आहे. सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. झालेले बदल तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे आहेत.

0106

पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये बदल होणार आहे. (important rules changes from 1st October).ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर तुमची बँक तसंच पगाराशी संबधित काही नियमात बदल होणार आहेत. तर बँकिंग नियमांपासून एलपीजी (एलपीजी किंमत) पर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे..

जाहिरात
0206

1. पेन्शन नियमात होणार बदल- 1 ऑक्टोबरपासून डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी (Digital life certificate) संबंधित नियम बदलत आहेत. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक जे 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रमाण केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे काम टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय डाक विभागाने जीवनप्रमाण केंद्राचा आयडी बंद असेल तर वेळेवर कार्यान्वित करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

जाहिरात
0306

2.1 ऑक्टोबरपासून नाही चालणार जुनं चेकबुक (Cheque book rules)- तुम्ही जर ओरिएंटल बँक (Oriental bank -OBC), अलाहाबाद बँक (Allahabad Bank) आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India - UBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबरपासून या बँकांचे जुने चेकबुक रद्द होणार आहे. या बँकांने 1 एप्रिल 2020 पासून इतर बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून अमान्य असणार आहे. या तीन्ही बँकांच्या ग्राहकांचे चेकबुक आणि बँकांचा MICR कोड इनव्हॅलिड होईल. बँकांच्या विलीनीकरणामुळे, खातेधारकांचा खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुने चेकबुक नाकारेल.

जाहिरात
0406

3. ऑटो डेबिट कार्डाचा नियम बदलणार (auto debit rules)- 1 ऑक्टोबरपासून तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डमधून होणाऱ्या ऑटो डेबिटसाठी आरबीआयचा (RBI Reserve Bank of India) नवा नियम लागू होणार आहे. याअंतर्गत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड किंवा मोबाइल वॉलेटमधून होणारे ऑटो डेबिट तोपर्यंत होणार नाहीत जोपर्यंत ग्राहक त्याकरता मंजुरी देत नाही. 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नवीन Additional Factor Authentication नियमानुसार, बँकेला कोणत्याही ऑटो डेबिट पेमेंटअंतर्गत पैसे वजा करण्यासाठी त्याबाबत ग्राहकाची 24 तासाआधी परवानगी घेणे आवश्यक आहे. ग्राहकाने कन्फर्म केल्यानंतरच त्याच्या खात्यातून पैसे वजा होतील. हे नोटिफिकेशन तुम्हाला sms किंवा ई-मेलद्वारे मिळेल.

जाहिरात
0506

4. गुंतवणुकीसंदर्भातील नियमात होणार बदल (Mutual fund related rules)- बाजार नियामक सेबीने (SEBI) आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन नवीन नियम आणला आहे. हा नियम अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMC) अर्थात म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लागू होईल. 1 ऑक्टोबर 2021 पासून AMC कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के रक्कम फंड हाऊसच्या म्युच्युअल फंड युनिटमध्ये गुंतवावी लागेल. तर 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने हा हिस्सा पगाराच्या 20 टक्के होईल. सेबीने याला स्किन इन द गेम म्हटले आहे. या गुंतवणूकीला लॉक-इन कालावधी देखील असेल.

जाहिरात
0606

5. LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल (LPG price)- 1 ऑक्टोबरपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केला जातो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या