मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.य ICICI बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. चंदा कोचर ,दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांना 2 दिवासांची सीबीआय कस्टडी देण्यात आली आहे. विशेष सीबीआय कोर्टाने पुन्हा 2 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. ICICI बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी होती. चंदा कोचर आणि दीपक कोचर याना आज तिसऱ्यांदा तर वेणूगोपाल यांना दुसऱ्यांदा कोर्टात हजर करण्यात आलं. विशेष CBI कोर्टात ही सुनावणी झाल्याची माहिती मिळाली आहे. CBI नं 3 दिवस CBI कोठडी मागितली होती. मात्र 2 दिवसांच्या कोठडीची परवानगी मिळाली आहे. कोचर आणी धूत यांच्या वकिलांनी जोरदार ही कोठडी मिळू नये यासाठी आपली बाजू लावून धरली होती.
नेमकं काय आहे प्रकरण? 2009 ते 2011 दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला नियम धाब्यावर बसवून कर्ज दिलं होतं. हे कर्ज देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर यांचाही समावेश होता. यापूर्वी ईडीने 3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या आरोपांनंतर त्यांना 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांनी चंदा कोचर यांच्या पतीला कोट्यवधी रुपये दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.