JOIN US
मराठी बातम्या / मनी / खूशखबर ! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढणार; जाणून घ्या किती वाढेल पगार?

खूशखबर ! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढणार; जाणून घ्या किती वाढेल पगार?

डीएमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के डीए मिळतो त्यांच्या डीएमध्ये वाढ होऊन तो 39 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 जुलै : एप्रिल महिन्यात एआयसीपीआय निर्देशांक (AICPI Index) 127 अंकांवर पोहोचला आहे. तसंच महागाई दर 6 टक्क्यांच्या वर पोहोचल्याने मोदी सरकारकडून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आज (1 जुलै 22) खूशखबर दिली जाण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance-DA) 5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता माध्यमांतील बातम्यांमधून वर्तवली जात आहे. हा निर्णय घेतल्यास 34 टक्के असलेला डीए 39 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वार्षिक 34,000 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम वाढू शकते.

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरून वाढून 34 टक्के करण्यात आला होता. एआयसीपीआय निर्देशांक वाढल्याने त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. आता एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर (Retail Inflation Rate) 7.79 टक्के म्हणजेच 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी सन 2022 च्या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत एआयसीपीआय निर्देशांकांत घसरण झाली होती. जानेवारी एआयसीपीआय निर्देशांक 125.1 व फेब्रुवारीत 125 होता. मार्चमध्ये यात एका अंकाने वाढ होऊन तो 126 वर पोहोचला. एप्रिलच्या आकड्यांनुसार, एआयसीपीआय निर्देशांक आता 127.7 वर पोहोचला आहे. यात 1.35 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवलं, सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

डीएमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के डीए मिळतो त्यांच्या डीएमध्ये वाढ होऊन तो 39 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Salary) 56,900 रुपये असेल तर त्याला 39 टक्के महागाई भत्ता 22,191 रुपयांपर्यंत मिळेल. सध्या 34 टक्के दराने कर्मचाऱ्यांना 19,346 महागाई भत्ता मिळत आहे. 5 टक्के डीए वाढवल्यास पगारात 2,845 रुपये वाढ होईल. म्हणजेच वार्षिक 34,140 रुपये कर्मचाऱ्यांना वाढून मिळणार आहेत.

आजपासून अनेक नवीन आर्थिक बदल लागू; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?

50 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

सरकारकडून वर्षातून दोन वेळा डीए वाढवून मिळतो. या वर्षीच्या सुरूवातीला सरकारकडून डीए वाढून मिळाला होता. आतापर्यंत 34 टक्क्यांपर्यंत डीए होता. जर यात 5 टक्के वाढ झाली तर 39 टक्के डीए मिळणार आहे. या निर्णयामुळे 50 लाखांपेक्षा अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना व 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

दरम्यान, केंद्रातील सरकारकडून डीए वाढवण्याचा निर्णय आज होणं अपेक्षित असून, याची घोषणा करण्यात येणार येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचं या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या