JOIN US
मराठी बातम्या / मनी / 'या' सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरता? आता खिशाला बसणार झळ

'या' सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरता? आता खिशाला बसणार झळ

सरकारी बँकेने एनुअल चार्जेस, डेबिट कार्ड रिप्लेसमेंट चार्जेज, डेबिट कार्ड इनअॅक्टिव्हिटी चार्जेस यावरील चार्जमध्ये वाढ केली आहे. सुधारित शुल्क 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होईल.

जाहिरात

कॅनरा बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर वाचा महत्त्वाची माहिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी: सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. कॅनरा बँकेने विविध प्रकारच्या डेबिट कार्डसाठी सर्व्हिस चार्जमध्ये वाढ केली आहे. कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, रिवाइज्ड चार्जेस 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होईल. सरकारी बँकेने अ‍ॅनुअल चार्जेस, डेबिट कार्ड रिप्लेसमेंट चार्जेस, डेबिट कार्ड इनअ‍ॅक्टिव्हिटी चार्जेस यावरील चार्जमध्ये वाढ केली आहे. चार्जेज वाढल्याने कॅनरा बँकेच्या ग्राहकांच्या खिशावर बोजा वाढणार आहे.

अ‍ॅनुअल फीस

कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, सरकारी बँकेने क्लासिक कार्डसाठी अ‍ॅनुअल फीस 150 रुपयांवरून 200 रुपये केले आहे. प्लॅटिनम आणि बिझनेस कार्डची अ‍ॅनुअल फीस अनुक्रमे 250 आणि 300 रुपये वरून 500 आणि 500 ​​रुपये करण्यात आले आहे. सेलेक्ट कार्डचे अ‍ॅनुअल फीसमध्ये कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही.

दुकानदार कॅरीबॅगचे वेगळे पैसे मागू शकतो का? काय सांगतो कायदा?

कार्ड रिप्लेसमेंट

बँक आता डेबिट कार्ड बदलण्यासाठी 150 रुपये आकारणार आहे. यापूर्वी क्लासिक कार्ड ग्राहकांसाठी यावर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. प्लॅटिनम, बिझनेस आणि सिलेक्ट डेबिट कार्डधारकांसाठी चार्जेज 50 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! या 10 बँकांमध्ये FD वर मिळतोय जबरदस्त परतावा

संबंधित बातम्या

डेबिट कार्ड Inactivity

बँक आता बिझनेस डेबिट कार्ड ग्राहकांकडून कार्डवर प्रति वर्ष फक्त 300 रुपये प्रति कार्ड Inactivity चार्जेज आकारेल. क्लासिक, प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्डधारकांवर कोणतेही चार्ज आकारले जाणार नाही.

SMS अलर्टसाठी चार्ज

कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, सर्विस चार्जमध्ये टॅक्स समाविष्ट नाहीत. लागू टॅक्स अतिरिक्त वसूल केले जातील. सुधारित सर्विस चार्ज 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या