JOIN US
मराठी बातम्या / मनी / कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबरी! आता बँक देतेय ही खास सुविधा

कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबरी! आता बँक देतेय ही खास सुविधा

रुपे क्रेडिट कार्ड ऑन यूपीआयच्या सुविधेने तुम्ही आता कोणत्याही दुकानावर यूपीआय क्युआर कोड स्कॅन करुन रुपे क्रेडिट कार्डनेही पेमेंट करु शकता.

जाहिरात

कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 मार्च: तुम्ही पब्लिक सेक्टरच्या कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कॅनरा बँक रुपे क्रेडिट कार्ड NPCI समर्थित UPI अ‍ॅप्स जसे BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादींवर लाइव्ह झाले आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे कॅनरा बँक रुपे क्रेडिट कार्ड या अ‍ॅप्सच्या UPI शी लिंक करू शकता आणि मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करून कोणत्याही  किराणा दुकानांमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये पेमेंट करू शकता. रुपे क्रेडिट कार्ड नुकतीच रुपे क्रेडिट कार्ड ऑन यूपीआय सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता तुम्ही शेजारच्या दुकानात स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकाल. RuPay क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करूनही पेमेंट देऊ शकता. P2P पेमेंट करू शकत नाही. सध्या HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्डधारक त्यांचे कार्ड BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI अ‍ॅप्सशी लिंक करू शकतात.

UPI वरुन किती पैसे पाठवता येतात? SBI, HDFC सह प्रमुख बँकांची लिमिट काय?

संबंधित बातम्या

5 बँकांचे रुपे क्रेडिट BHIM/Paytm/Mobikwik/Freecharge वर लाइव्ह झालेय

BHIM, Paytm, Mobikwik, PayZapp, Freecharge यांसारख्या UPI अ‍ॅप्सवर 5 बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड आता वापरता येते. भविष्यात, तुम्ही तुमचे RuPay क्रेडिट कार्ड इतर UPI अ‍ॅप्सशी देखील लिंक करू शकाल. सध्या, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेचे रुपे क्रेडिट कार्डवर ही सुविधा मिळते.

रुपे क्रेडिट कार्ड BHIM अ‍ॅपशी कसं लिंक करावं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या