मुंबई : तुम्ही नवीन गोष्टींची खरेदी करण्याची संधी शोधत असाल तर थांबा, कारण पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मोठा सेल सुरू होत आहे. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल अजूनही सुरू आहे. या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. कंपनीच्या ‘बिग दिवाळी सेल इव्हेंट’ची माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टने चुकून त्याच्या प्लॅटफॉर्मवर आगामी सेलचा टीझर पोस्ट केला. नंतर कंपनीने हा टीझर डिलीट केला. यादरम्यान काही लोकांनी टीझरचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. टिपस्टर मुकुल शर्मानेही त्याच्या ट्विटर हँडलवर सेलचा टीझर शेअर केला आहे. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
हा सेल 8 ऑक्टोबरपर्यंत असेल. फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना पहिल्या दिवसापासून विक्रीचा फायदा घेता येईल. आगामी सेलची टॅगलाइन ‘शॉपिंग का बडा धमाका’ आहे. यावरून असे दिसून येतं की सेल दरम्यान कंपनी उत्पादनांवर मोठी सूट देऊ शकते.