नवी दिल्ली, 26 मार्च : लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातील अनेक भागात बंद पाळण्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर बुधवारी 25 मार्च ते 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊनचं पालन करण्यात येणार आहे. दरम्यान बँकांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये होत असल्याने बँका मात्र सुरू राहणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयच्या सुद्धा सर्वाधिक शाखा देशामध्ये खुल्या आहेत. मात्र बँकांच्या वेळात मात्र बदल करण्यात आले आहेत. (हे वाचा- सरकारची गरिबांसाठी अन्न आणि धान्य योजनेची घोषणा, खर्च करणार 1.70 लाख कोटी ) SBIचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने जिल्हा आणि राज्य प्रशासनाबरोबर चर्चा करून बँकांच्या वेळांमध्ये निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितलं की अनेक राज्यांमध्ये बँकांची वेळ सकाळी 7 ते 10 आहे, तर काही ठिकाणी सकाळी 8 ते 11 ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत बँका खुल्या राहणार आहेत. खाजगी क्षेत्रातील स्टँडर्ट चार्टड बँकेच्या सर्व शाखांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याच वेळांनुसार काम होणार आहे. HDFC, ICICI आणि Axix बँकेच्या वेळातही बदल याआधी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांनी त्यांच्या कामकाजाची वेळ बदलली आहे. त्याचप्रमाणे या बँकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत एचडीएफसी बँक रविवार सोडून इतर दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे. (हे वाचा- अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, गोरगरीब जनतेसाठी 1 लाख 70 हजार कोटी ) आयसीआयसीआय बँकेने सुद्धा SMSच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांना सांगितलं आहे की, त्यांच्या शाखा कमी झालेला स्टाफ आणि हायजीनसाठी केलेले नियम यांसारख्या आवश्यक बाबींच पालन करत सुरू राहतील. एक्सिस बँकेने 23 मार्चपासून 31 मार्चपर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएममधून व्यवहार आणि ऑनलाइन IMPS निःशुल्क ठेवण्याची घोषणा केली आहे. ही सुविधा बचत, चालू आणि प्रीपेड खातेधारकांसाठी लागू आहे.