2000 रुपयांच्या नोट बदलताना कोणं अडवलं तर?
नवी दिल्ली : आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (20मे) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. या नोटा बँकांमध्ये जमा करुन त्या बदलून घेण्यासाठी सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, ही नोट अवैध ठरलेली नसून, ती अजूनही कायदेशीर आहे. सप्टेंबरनंतर याविषयी नक्की सांगता येणार नाही. त्यामुळे या नोटा परत बँकेत जमा करणं हितावह आहे. बँकेनेच 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर या नोटांचं काय करायचं, असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. सर्वप्रथम, हे घडण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण आरबीआयच्या आदेशाचे पालन प्रत्येक बँकेला करावेच लागणार आहे. समजा असं झालं तरीही तुमच्याकडे अजून दोन पर्याय असतील, ज्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार पुढे पाठवू शकता.
ही प्रक्रिया कशी आहे? अशा स्थितीत तक्रारदार/ पीडित ग्राहकाने प्रथम त्यांच्या संबंधित बँकेकडे तक्रार नोंदवावी. ग्राहकाने तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित बँकेने त्याला 30 दिवसांच्या आत उत्तर देणं बंधनकारक आहे. जर बँकेने दिलेल्या मुदतीत तक्रारीची दखल घेतली नाही तर ग्राहक आरबीआयकडे धाव घेऊ शकतात. असे ग्राहक आरबीआयच्या इंटिग्रेटेड ऑम्बस्ड्मन स्कीम अंतर्गत त्यांच्या cms.rbi.org.inया पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता.
2000 Note : किती नोटा छापायच्या हे कोण ठरवतं, कुठे छापल्या जातात?नोट बंद करण्याचे कारण काय? 2016 मध्ये पहिल्यांदा 2000 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यावेळी नोटाबंदीमुळे बाजारातील पैशाची अनुपलब्धता दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता. 2018-19 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. पण त्यांचे वितरण खूप कमी होतं आणि आता 500 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत. त्यामुळे क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चलनात असलेल्या 10.8 टक्के नोटा या 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत. त्याचवेळी 31 मार्च 2018 पर्यंत या 37.3 टक्के नोटा चलनात होत्या.
RBI on 2000 Rupees Note : 2000 ची नोटबंदी, बँकेत एकाच वेळी किती पैसे भरता येणार?क्लिन नोट पॉलिसी म्हणजे काय? क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत भारतीय रुपयाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा चलनातून बाहेर काढल्या जातात. अशा नोटा परत करण्यासाठी ग्राहक आल्यास त्यांच्याकडून त्या नोटा परत घ्याव्यात, असे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत. त्यानंतर आरबीआय त्यांच्या जागी नवीन नोटा जारी करत असते.