JOIN US
मराठी बातम्या / मनी / या आठवड्यात सर्व सरकारी-निमसरकारी बँका 4 दिवस बंद राहणार! काय आहे कारण?

या आठवड्यात सर्व सरकारी-निमसरकारी बँका 4 दिवस बंद राहणार! काय आहे कारण?

या आठवड्यात सर्व सरकारी आणि निमसरकारी बँका 4 दिवस बंद राहणार आहेत. या आठवड्यात होळीच्या सणामुळे बँका दोन दिवस बंद राहणार आहेत. त्यानंतर शनिवार आणि रविवार पडत आहेत, त्यामुळे सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत.

जाहिरात

Bank Holiday in August 2022: ऑगस्टमध्ये बँका 11 दिवस बंद; आर्थिक कामांचं नियोजन करण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च : भारतात सणांची काही कमी नाही. वेगवेगळे धर्म आणि जातींमध्ये विविध स्वरुपाचे सणसमारंभ साजरे केले जातात. त्यामुळे विविध राज्यातील लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन या सणांना बँकांना सुट्ट्या दिल्या जातात. या आठवड्यातही अशाच सणांमुळे बँकांना तब्बल चार दिवस सुट्टी देण्यात आली आहे. मार्च 2022 च्या या आठवड्यात सर्व खाजगी आणि सरकारी बँका 4 दिवस बंद राहतील. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, परदेशी बँका, सहकारी बँका आणि भारतातील प्रादेशिक बँकांना हे करावे लागणार आहे. RBI ने या श्रेण्यांतर्गत बँकांसाठी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. प्रत्येक राज्यासाठी बँकेच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. यात असे काही दिवस असतात जेव्हा भारतभर बँका बंद असतात. उदाहरणार्थ प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट), गांधी जयंती (2 ऑक्टोबर), ख्रिसमस डे (25 डिसेंबर) इत्यादी. या बँकांमध्ये झाले सर्वाधिक Bank Fraud, तुमचंही खातं यात आहे का? भारतातील बहुप्रतिक्षित सणांपैकी एक, होळी हा विविध राज्यांमध्ये विशेषतः बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. शहरानुसार यादी 17 मार्च 2022 - ‘होलिका दहन’ निमित्त डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांची येथे बँका बंद राहतील. 18 मार्च, 2022 – होळी/धुलेती/दोलयात्रेच्या निमित्ताने अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, लखनौ, कोलकाता, मुंबई, नागपूर, रांची, शिलाँग, जम्मू आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील. 19 मार्च 2022 - भुवनेश्वर, पाटणा आणि इंफाळमध्ये होळी/याओसांगच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या