JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / 1 ऑक्टोबरपासून निरुपयोगी ठरतील या 3 बँकांचे चेकबुक, त्वरित करा या क्रमांकावर कॉल

1 ऑक्टोबरपासून निरुपयोगी ठरतील या 3 बँकांचे चेकबुक, त्वरित करा या क्रमांकावर कॉल

Alert for Bank Customers: बँक कस्टमर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दोन दिवसानंतर या बँकांचे चेकबुक निरुपयोगी ठरणार आहेत. जाणून घ्या काय आहे कारण

0106

तुम्ही जर ओरिएंटल बँक (Oriental bank -OBC), अलाहाबाद बँक (Allahabad Bank) आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India - UBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबरपासून या बँकांचे जुने चेकबुक रद्द होणार आहे.

जाहिरात
0206

ओरिएंटल बँक (Oriental bank -OBC), अलाहाबाद बँक (Allahabad Bank) आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India - UBI) च्या ग्राहकांचे चेकबुक 1 ऑक्टोबरपासून रद्द होणार आहे.

जाहिरात
0306

ओरिएंटल आणि यूनायडेट बँकेचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झाल्याने (Punjab National Bank) या बँकांचे जुने चेकबुक रद्द केले जाणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून हे विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून अमान्य असणार आहे.

जाहिरात
0406

पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank Tweet) एका ट्वीटद्वारे म्हटले आहे की, 1 ऑक्टोबरपासून ई-ओबीसी आणि ई-यूएनआय बँकांची जुनी चेकबुक पैसे भरण्यासाठी किंवा बँकेतून पैसे काढण्यासाठी काम करणार नाहीत. ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल. ज्यांच्याकडे जुने चेकबुक आहे त्यांनी ते बदलून घ्या. आता नवीन चेकबुक नवीन IFSC कोड आणि PNB चा IMCR नंबरसह तुम्हाला मिळेल.

जाहिरात
0506

नवीन चेकबुकसाठी करा अप्लाय- तुम्ही बँकेच्या शाखेला भेट देऊन नवीन चेकबुक मिळवू शकता. ग्राहक ऑनलाइन अर्जही करू शकतात. तुम्ही इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाईन चेकबुकसाठी अर्ज करू शकता.

जाहिरात
0606

जर तुम्हाला चेकबुक मिळवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही कस्टमर केअरला देखील कॉल करू शकता. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पीएनबीचा टोल फ्री क्रमांक 18001802222 आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या