JOIN US
मराठी बातम्या / मनी / या बँकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी, हे आहे कारण

या बँकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी, हे आहे कारण

गेल्या काही महिन्यांत काही वरिष्ठ लोकांनी बँकेचं काम सोडलं आहे. बँकेमध्ये काळाच्या ओघात झालेले बदल हे यामागचं कारण सांगितलं जातंय. बँक नव्या लोकांना वेगाने भरती करतंय, असं बँकेचं म्हणणं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जानेवारी : अ‍ॅक्सिस बँकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांनी मागच्या काही महिन्यांत बँकेची नोकरी सोडली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार बँकेचं व्यवस्थापन बदलल्याने कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी येतायत. यामुळे मध्यम स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बँकेची नोकरी सोडली आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या एमडी आणि सीईओ शिखा शर्मा यांनी पद सोडल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेने या पदावर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा आहे. अमिताभ चौधरी 2010 पासून HDFC स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्सचे सीईओ आणि एमडी ही होते. बँकेच्या कामात बदल इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही महिन्यांत काही वरिष्ठ लोकांनी बँकेचं काम सोडलं आहे. बँकेमध्ये काळाच्या ओघात झालेले बदल हे यामागचं कारण सांगितलं जातंय. बँक नव्या लोकांना वेगाने भरती करतंय, असं बँकेचं म्हणणं आहे. बँकेच्या यंत्रणेत मोठा बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलांमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल चिंता वाटत होती. या सगळ्या बदलांशी ते जमवून घेऊ शकत नव्हते, असं बँकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं. अ‍ॅक्सिस बँकेने या आर्थिक वर्षात एकूण 28 हजार लोकांना नोकरीमध्ये ठेवलं होतं. जानेवारी ते मार्च या तिमाहीत बँकेने 4 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची योजना तयार केली आहे. (हेही वाचा : मोदी सरकारच्या ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि दुप्पट पैसे मिळवा) इन्शुरन्स क्षेत्रात पाऊल? बँकेला नियंत्रकांची मंजुरी मिळाल्यानंतर Axis Bank इन्शुरन्स क्षेत्रात पाऊल ठेवेल, असं बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी सांगितलं. Axis Bank इन्शुरन्सची मोठी डिस्ट्रिब्युटर आहे. रेग्युलेटरी मंजुरी मिळाल्यानंतर ही बँक इन्शुरन्स क्षेत्रात जाईल. रिझर्व्ह बँकेने रेग्युलेटरी बदल केले आहेत. बँकांना इन्शुरन्समध्ये जास्त भागीदारीची मंजुरी नाही. यामुळे अ‍ॅक्सिस बँक नवी इन्शुरन्स कंपनी काढणार नाही पण एखादी चांगली इन्शुरन्स कंपनी खरेदी करण्यावर अ‍ॅक्सिस बँकेची नजर आहे. =====================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या