JOIN US
मराठी बातम्या / मनी / ATM मधून एका दिवसात कॅश काढण्याची लिमिट किती? रुपे डेबिट कार्डचा नियम काय?

ATM मधून एका दिवसात कॅश काढण्याची लिमिट किती? रुपे डेबिट कार्डचा नियम काय?

ATM Cash Withdrawal Limit: एटीएममधून एका दिवसात किती पैसे काढू शकता याविषयी बँकांचे काही नियम आहेत. आज आपण देशातील काही प्रमुख बँकांच्या रुपे कार्डमधून पैसे काढण्याच्या विड्रॉलचा नियम सांगत आहोत.

जाहिरात

एटीएम कॅश विड्रॉल लिमिट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून: डिजिटल बँकिंगच्या या काळात बहुतांश कामं ऑनलाइन केली जातात. तसेच अनेक प्रकारच्या गरजांसाठी कॅशची आवश्यकता असते. अशा वेळी एटीएममधून पैसे काढणं गरजेचं असतं. पण तुम्ही एका दिवसात एटीएम मशीनमधून किती पैसे काढू शकता हे तुम्हाला माहितीये का? वेगवेगळ्या बँकांचे/कार्डचे याबाबत वेगवेगळे नियम आहेत. येथे आम्ही तुम्हाला देशातील काही प्रमुख बँकांचे डेली कॅश विड्रॉल नियम सांगत आहोत.

कॅश विड्रॉलसाठी आणि पर्चेच ट्रांझेक्शनसाठी तुमची RuPay कार्ड लिमिट बँकेवर अवलंबून असते. याव्यतिरिक्त, बँका एटीएम आणि पीओएस मशीनच्या ट्रांझेक्शनसाठी डेली लिमिटही ठरवत असते आणि हे कार्डच्या प्रकारानुसार बदलू शकतात. RuPay डेबिट कार्डसाठी अॅनुअल सब्सक्रिप्शन फीस बँकांवर अवलंबून असते. RuPay Debit Card व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतात. यामध्ये सरकारी योजना, क्लासिक, प्लॅटिनम आणि सेलेक्टचा समावेश असतो. चला तर मग बँकांच्या वेबसाइटनुसार, कार्डची डेली कॅश आणि ट्रांझेक्शन लिमिट काय आहे.

Credit Card Bills : आर्थिक तंगीमुळे क्रेडिट कार्डचं बॅलेन्स भरणं कठीण जातंय? या 4 टिप्स येतील कामी

SBI Rupay Card Limit

डोमेस्टिक एटीएमवर एसबीआयची किमान ट्रांझेक्शन लिमिट 100 रुपये आणि कमाल व्यवहार मर्यादा 40 हजार रुपये आहे. दैनंदिन ऑनलाइन व्यवहाराची कमाल मर्यादा 75 हजार रुपये आहे.

HDFC Bank Rupay Premium Limit

डोमेस्टिक एटीएममधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा 25,000 रुपये ठरवण्यात आली आहे. दैनंदिन डोमेस्टिक शॉपिंगची लिमिट 2.75 लाख रुपये आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवर प्रतिदिन 2000 रुपयांच्या कमाल मर्यादेसह व्यापारी आस्थापने (POS) मध्ये कॅश विड्रॉलची सुविधा मिळू शकते. POS द्वारे दरमहा जास्तीत जास्त 10,000 रुपये काढता येतात.

CUR: क्रेडिट यूटिलायझेशन रेश्यो म्हणजे काय? याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कसा होतो परिणाम?

संबंधित बातम्या

PNB Select Rupay Card Limit

PNB Rupay NCMC प्लॅटिनम डेबिट कार्डवर दररोज एटीएम लिमिट 1 लाख रुपये आणि POS/Ecom कंबाइंड लिमिट 3 लाख रुपये प्रतिदिन आहे. PNB ने पैसे काढण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. बँकेने पीएनबी एटीएमवर 15,000 रुपये आणि इतर बँकेच्या एटीएमवर 10,000 रुपये निश्चित केले आहेत.

Yes Bank Rupay Platinum card

येस बँकेची डेली कॅश विड्रॉल लिमिट 25,000 रुपये आणि POS वर डेली पर्चेज लिमिट 25,000 रुपये ठरवण्यात आली आहे. पगारदार ग्राहकांसाठी, एटीएम आणि पीओएस मधील ट्रांझेक्शन लिमिट 75,000 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या