JOIN US
मराठी बातम्या / मनी / अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीयाचा डंका, 8.93 लाख कोटींच्या कंपनीचा होणार CEO

अमेरिकेत पुन्हा एकदा भारतीयाचा डंका, 8.93 लाख कोटींच्या कंपनीचा होणार CEO

परदेशातील प्रख्यात मल्टिनॅशनल कंपन्यांचं नेतृत्व करणाऱ्या भारतीयांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला, गुगल आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई, मास्टरकार्डचे CEO अजय बांगा, पेप्सीकोचे CEO इंद्रा नुयी आणि अडॉबचे CEO शंतनू नारायण यांच्या पंक्तीत आता आणखी एक भारतीय जाऊन बसणार आहे. IBM या आयटी कंपनीच्या CEO पदावर एका भारतीयाची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 जानेवारी : अमेरिकन बिझनेस सेक्टरमध्ये भारतीयांचा बोलबाला आहे. अनेक मोठ्या पदांवर पदांवर भारतीय वंशाच्या नागरिकांची मोहोर लागली आहे. यामध्ये सुंदर पिचाई, सत्या नडेला यांसारखी नावं आपल्या ओठांवर आहेत. याच पंक्तीमध्ये आणखी एक भारतीय जाऊन बसणार आहे आणि ते नाव आहे भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा. अमेरिकेतील नामांकित इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (IBM) या कंपनीच्या CEO पदावर अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मार्केटमध्ये या कंपनीची किंमत 12 हजार 588 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 8.93 लाख कोटी रुपये आहे. 6 एप्रिल 2020 पासून 57 वर्षीय अरविंद कृष्णा CEO पदाचा कार्यभार स्विकारतील. कृष्णा सध्या IBM मध्ये क्लाउड आणि कॉग्निटीव्ह सॉफ्टवेअरसाठी वरिष्ठ उपाध्यक्ष (Senior Vice President) म्हणून काम पाहतात. 1990पासून ते IBM मध्ये कार्यरत आहेत. IBMच्या सध्याच्या CEO वर्जिनीया रोमेटी, ज्या 40 वर्षानंतर IBMमधून निवृत्ती घेत आहेत, त्यांनी अरविंद कृष्णा यांना ‘ब्रिलियंट टेक्नोलॉजिस्ट’ म्हणून संबोधलं आहे. अरविंद कृष्णा यांचा अल्पपरिचय -अरविंद कृष्णा जरी अमेरिकेतील महत्त्वाची कंपनी असणाऱ्या IBM च्या मुख्य पदावर पोहोचले असले तरी त्यांची भारताशी नाळ जोडलेली आहे. IIT कानपूरचे ते पदवीधर आहेत. -त्याचप्रमाणे त्यांनी युनिवर्सिटी ऑफ इलनॉइज, अर्बाना-शँपेनमधून पीएचडी पूर्ण केली आहे. एक प्रभावी ऑपरेशनल लीडर म्हणून कृष्णा यांच्याकडे पाहिलं जातं. -IIT कानपूर आणि इलनॉइज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून कृष्णा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे 15 पेटंट्सचे ते सह-लेखक. -IEEE आणि ACM जरनल्सचे संपादक आहेत. (हेही पाहा :  Budget 2020: वडिलांचं निधन झाल्यानंतरही हे अधिकारी करताहेत ‘बजेट’चं काम  )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या