JOIN US
मराठी बातम्या / मनी / व्वा! रेल्वेच्या तिकीटाएवढ्याच दरात करता येणार विमान प्रवास... ही कंपनी देतेय 'ऑफर'

व्वा! रेल्वेच्या तिकीटाएवढ्याच दरात करता येणार विमान प्रवास... ही कंपनी देतेय 'ऑफर'

तुम्हाला रेल्वेच्या तिकिटासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढ्याच किंवा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये विमानाचा प्रवास करता येणार.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात का? तेही विमानानं? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता तुम्हाला रेल्वेच्या तिकिटासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढ्याच किंवा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये विमानाचा प्रवास करता येणार आहे. देशांतर्गत उड्डाण सेवा देणाऱ्या एका विमान कंपनीनं ही ऑफर आणली आहे. आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करावा, अशी अनेकांची इच्छा असते, पण हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. अनेकांची ही इच्छा अपूर्णच राहते. मात्र आता तुम्ही हे स्वप्न सहज पूर्ण करू शकता. कारण देशांतर्गत उड्डाण सेवा देणारी ‘अकासा एअर’ ही खासगी विमान कंपनी रेल्वे तिकिटांच्या दरामध्ये विमानाचं तिकीट देत आहे. हे तिकीट तुम्ही कसं बुक करू शकता, ते जाणून घेऊया. अकासा एअर देशातील निवडक मार्गांवर तिकीट बुकिंगमध्ये मोठी सूट देत आहे. ट्रेनच्या एसी क्लासच्या तिकिटाच्या किंमतीत तुम्ही या हवाई सेवेचा आनंद घेऊ शकता. अनेकांना कंपनीची ही ऑफर प्रचंड आवडली असून, तिकीट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय. हे परवडणारं विमानाचं तिकीट तुम्हालाही बुक करायचं असेल, तर तुम्हाला अकासा एअरलाइनच्या वेबसाइटवर जावं लागलं. हे वाचा- या बँका देताएत एफडीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज, एका सरकारी बँकेचाही समावेश मात्र, तिकीटाचं बुकिंग करण्यापूर्वी सवलतीच्या दरात कोणत्या मार्गांवर तिकिटं दिली जात आहेत. याची खात्री करा. सवलतीच्या दरात तिकिटं दिली जात असलेल्या मार्गांवरील प्रवास तुम्हाला करायचा असेल, तर तुम्ही वेबसाइटद्वारे तिकीट ऑनलाइन बुक करू शकता. हे विमानप्रवासाचं तिकीट तुम्हाला ट्रेनच्या तिकीटापेक्षाही स्वत पडेल. उदाहरणार्थ, अहमदाबाद ते मुंबई या ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी कोचचं तिकीट सुमारे 3 ते 6 हजार आहे. तर अकासा एअर या मार्गावरील तिकीट 1950 ते 2250 रुपयांपर्यंत देत आहे. अकासा एअर लाँच झाल्यापासून चर्चेत ज्या एअरलाइनने विमान प्रवास तिकीटामध्ये ही मोठी सवलत दिली आहे, ती अकासा एअर ही विमानसेवा सुप्रसिद्ध शेअर बाजारतज्ज्ञ दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी काही काळापूर्वी सुरू केली होती. लाँच झाल्यापासून ही एअरलाइन सतत चर्चेचा विषय राहिली आहे. आता अकासा एअरने सुरू केलेल्या ऑफरमुळे ‘इंडिगो’ आणि ‘गो फर्स्ट’ या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या अडचणी वाढू शकतात. हे वाचा-PM Ujjwala Yojana: घरा-घरात मोफत गॅस सिलिंडरची सुविधा, काय आहे ही योजना

पण खासगी विमान कंपन्यांमध्ये वाढत असलेल्या या स्पर्धेमुळे सर्वसामान्यांचा चांगलाच फायदा होऊ शकतो. कारण या वाढत्या स्पर्धेमुळेच एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणारं विमानाचं तिकीट आता त्यांना परवडेल, अशा किंमतीमध्ये मिळू लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या