JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Air India Property Auction: आज मुंबईमध्ये स्वत:चं घर खरेदी करण्याची संधी, या ठिकाणीही मिळेल स्वस्तात प्रॉपर्टी

Air India Property Auction: आज मुंबईमध्ये स्वत:चं घर खरेदी करण्याची संधी, या ठिकाणीही मिळेल स्वस्तात प्रॉपर्टी

तुम्ही जर मुंबईसारख्या मोठ्या शहरात घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर लवकरच ते पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही ऑनलाइन बोली लावून या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता

0107

तुम्ही दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात घर घेण्याचा (Own flat or property) विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. विमानकंपनी एअर इंडिया (Air India) आता देशभरात त्यांच्या विविध प्रॉपर्टीजना विकण्याची योजना आखत आहे.

जाहिरात
0207

यामध्ये फ्लॅट आणि अन्य काही कमर्शिअर मालमत्तेचाही (residential, commercial and plots) समावेश आहे. या माध्यमातून 270 कोटी जमा करण्याचा एअर इंडियाचा मानस आहे. देशातील मोठ्या 10 शहरांमध्ये ही प्रॉपर्टी आहे

जाहिरात
0307

कंपनीकडून याकरता ई-लिलावाचे (Online auction)आयोजन करण्यात येणार आहे. हा लिलाव 8 जुलै, 2021 रोजी सुरू होणार असून 9 जुलै रोजी संपेल. आज दुपारी 2 वाजता या लिलावास सुरुवात होणार असून तो उद्या दुपारी अडीच वाजता संपेल.

जाहिरात
0407

13.3 लाख रुपये असेल सुरुवातीची बोली- मनीकंट्रोलमधील वृत्तानुसार, या यूनिट्सची सुरुवातीची बोली 13.3 लाख रुपये असेल. ग्राहकांना जवळपास 150 कोटी रुपयांपर्यंत बोली लावता येणार आहे. या लिलावामध्ये अशाही काही संपत्ती आहेत ज्या आधीही अनेकदा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

जाहिरात
0507

एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईमध्ये एक रहिवासी प्लॉट आणि फ्लॅट, नवी दिल्लीमध्ये पाच फ्लॅट, बंगळुरुमध्ये एक रहिवासी प्लॉट आणि कोलकातामध्ये चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्ता विकणार आहे.

जाहिरात
0607

याशिवाय औरंगाबादमध्ये एक बुकिंग कार्यालय आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमध्ये सहा फ्लॅट, नागपूरमध्ये बुकिंग ऑफिस, भुजमध्ये एअरलाइनचं हाउस आणि एक रहिवासी फ्लॅट तर तिरुवनंतपुरममध्ये एक रहिवाशी फ्लॅट आणि मंगळुरुमध्ये दोन फ्लॅट आहेत.

जाहिरात
0707

10 टक्क्यांपर्यंत मिळेल सूट- एअर इंडियाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यापैकी काही संपत्ती, विशेषत: टिअर 1 शहरातील आरक्षित मुल्य कमी केलं आहे. अर्थात टिअर 1 शहरात ही एअरलाइन कंपनी संपत्ती खरेदी करण्यावर विशेष सवलत देत आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, या संपत्तींमध्ये जवळपास 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या