नवी दिल्ली, 10 जानेवारी: एअर इंडियानं (Air India) भारतीय विमान प्रवाशांना (Air Travellers) मोठा दिलासा (Relief) दिला असून अगोदर बुकिंग (Booking) केलेल्या प्रवासाची तारीख (Date of travel) बदलण्यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे (No charges) लागणार नसल्याचं जाहीर केलं आहे. साधारणतः विमानाचं तिकीट काढल्यानंतर तर प्रवासाची तारीख बदलण्याची वेळ आली, तर त्यासाठी वेगळा आकार विमान कंपन्यांकडून आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते आणि विमान कंपन्यांचा फायदा होतो. अनेकदा सवलतीच्या दरात होणाऱ्या ऍडव्हान्स बुकिंगपैकी अनेकांचे प्रवासाचे बेत रद्द झाल्यामुळे किंवा त्यात बदल झाल्यामुळे विमान कंपन्यांना फायदाच होत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली अनिश्चितता पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं ‘ए्अऱ इंडिया’कडून जाहीर करण्यात आलं आहे. काय आहे निर्णय? सध्या देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रवासाचे बेत बदलण्याची शक्यता गृहित धरून 31 मार्च 2022 पर्यंत ही सवलत एअर इंडियानं लागू केली आहे. यानुसार कुठल्याही प्रवाशाला आपल्या प्रवासाची तारीख एकदा बदलण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र दुसऱ्यांदा तारीख बदलायची असेल, तर त्याचा आकार भरावा लागणार आहे.
प्रवाशांना फायदा यापूर्वी इंडिगो आणि स्पाईसजेटनं ही सवलत प्रवाशांसाठी लागू केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक क्षेत्रात अनिश्चिततेचं वातावरण आहे. कुठल्याही कारणांसाठी प्रवाशांच्या प्रवासाचे बेत पुढे मागे होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विमान कंपन्यांनी विशेष बाब म्हणून ही सवलत जाहीर केली आहे. हे वाचा -
विमान कंपन्यांवर दबाव कोरोनाच्या संकटाचा दबाव विमान कंपन्यांवरही येत असल्याचं चित्र आहे. इंडिगोनं आपल्या 20 टक्के फेऱ्या कमी केल्या आहेत. एखादं विमान रद्द करायचं असेल, तर ते प्रवासाच्या वेळेअगोदर कमीत कमी 72 तास रद्द केलं जाईल आणि प्रवाशांना त्यापुढील विमानाचं बुकिंग दिलं जाईल, असं जाहीर करण्यात आलं आहे.