JOIN US
मराठी बातम्या / मनी / Air India ची 'घुमो इंडिया' ऑफर, 799 रुपयांत काढा विमानाचं तिकीट

Air India ची 'घुमो इंडिया' ऑफर, 799 रुपयांत काढा विमानाचं तिकीट

एअर इंडिया ने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. यामध्ये विमानाने फिरण्यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करावे लागणार नाही यासाठी तुम्हाला द्यायचे आहेत फक्त 799 रुपये.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : कर्जामध्ये बुडालेली सरकारी एअरलाइन एअर इंडिया (Air India) ने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. विमानाने फिरण्यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करावे लागणार नाही. तुम्हाला द्यायचे आहेत फक्त 799 रुपये. याशिवाय 4 हजार 500 रुपये देऊन तुम्ही परदेशातही जाऊ शकता. हे तिकीट बुक करण्याची आज शेवटची संधी आहे. आज 17 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत तिकीट बुक करू शकता. काय आहे ही ऑफर? ‘एअर इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही 17 फेब्रुवारीच्या आत रात्री 12 वाजेपर्यंत तिकीट बुक करू शकता. सेलच्या अंतर्गत खरेदी केलेल्या तिकिटांवर 18 फेब्रुवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. ही ऑफर फक्त सौदी अरेबियासाठी लागू नाही.तिकीट बुक केल्यानंतर सामानाबद्दल मात्र जुनेच नियम असतील. 799 रुपये सुरुवातीची किंमत एअर इंडियाने प्रवाशांना 799 रुपयांच्या सुरुवातीच्या तिकिटावर देशात प्रवास करण्याची संधी दिली आहे. त्याचवेळी तुम्ही 4 हजार 500 रुपये देऊन आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तिकीट बुक करू शकता. इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांसाठी ही विशेष सूट आहे. हे बुकिंग Air India ची वेबसाइट, मोबाइल अॅप, बुकिंग ऑफिस आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून करू शकता.

(हेही वाचा : ‘या’ बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज)

‘घुमो इंडिया’ ऑफर या ऑफरप्रमाणेच ‘एअर इंडिया’ ने घुमो इंडिया फॅमिली फेअरचीही सुरुवात केली आहे. यामध्ये प्रवाशांना 25 टक्क्यांची सूट दिली जातेय. या ऑफरमध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 जणांचं तिकीट बुक केलं जाऊ शकतं. 31 मार्च 2020 पर्यंत या ऑफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता.‘एअर इंडिया’वर एकूण 58 हजार 255 कोटींचं कर्ज आहे. सध्या एअर इंडिया निर्गुंतवणुकीकरणाच्या प्रक्रियेतून जातेय. एअर इंडियावर 55 हजार 308 रु. कोटींचं कर्ज आहे. त्यामुळेच या शेवटच्या टप्प्यात एअर इंडियाने ही ऑफर आणली आहे. ======================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या