साईप्रसाद महेंद्रकर/ प्रतिनिधी कोल्हापूर, 28 एप्रिल : उसाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात पोषक वातावरण असल्यामुळे बहुतांश शेतकरी आपल्या शेतात ऊस पिकच घेतात. मात्र काही शेतकरी याला अपवाद ठरतात. अशाच प्रकारे कोल्हापुरातील एक शेतकरी गेली काही वर्षे पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत आपल्या शेतात वांग्याचे उत्पादन घेत आहे. गेली काही वर्षे तो असे वांग्याचे उत्पादन घेऊन लाखोंचा नफा कमावत आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या गावी शेतकरी सुदर्शन जाधव राहतात. त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण नऊ एकर शेतीपैकी एकूण सात एकर बागायत जमीन, तर दोन एकर जिरायत जमीन असे शेती आहे. तर याच शेतात जाधव कुटुंबीय मेहनत घेत असतात. गेल्या दहा ते बारा वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फळभाज्या आणि पालेभाज्या यांची शेती करत वर्षाखेर तब्बल बारा लाखांच्या आसपास उत्पन्न जाधव घेत आहेत.
सुदर्शन असे करु लागले शेती सुदर्शन यांनी बीएपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आपल्या घरगुती शेतीच्या व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र ऊस, सोयाबीन,भुईमुग अश्या पारंपरिक पिकांचे उत्पन्न न घेता त्यांनी शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी कमी प्रमाणात फळभाज्या व पालेभाज्यांची शेती केली. त्यानुसार त्यांनी दोन एकर शेतात फळभाज्यांची शेती केली. गॅलन वांग्याची फायदेशीर शेती सुदर्शन हे त्यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रात गॅलन जातीच्या वांग्याची यशस्वी शेती करत आहेत. भरिताचे वांगे म्हणून देखील याला ओळखले जाते. या जातीच्या वांग्याची खासियत म्हणजे हे कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. या पिकाला साधारण 70 व्या दिवसापासूनच फळे मिळण्यास सुरुवात होते. तर पुढे 3 ते 4 महिने सरासरी तब्बल 40 टन गॅलन वांगीचे उत्पन्न सुदर्शन काढतात. त्याचबरोबर बाजारपेठेत या गॅलन वांग्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे सुदर्शन हे या वांग्याची शेती गेल्या तीन वर्षांपासून करत आहेत. वांग्याला आहे चांगली मागणी शेतातील या गॅलन वांग्याच्या पीकाची कोल्हापूरसह मुंबई, पुणे, गोवा बेळगाव येथील बाजारपेठेत विक्री होते. या वांग्याचा भरीत बनवण्यासाठी त्याचबरोबर माशा बरोबर खाण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे या वांग्याला मागणीही असते, असे सुदर्शन यांनी सांगितले. अशी केली शेती फळभाज्यांची शेतीचा अभ्यास करत करत दोडका, कारले, काकडी आदी पिके आणि त्यांची बाजारातील मागणी यांच्यावर लक्ष दिले. त्याचबरोबर पाण्याची समस्या मिटवण्यासाठी सुदर्शन यांनी शेतात एका एकरात विहीर बांधून घेतली. या विहिरीचे पाणी शेतीला वापरल्यामुळे सुदर्शन यांनी संपूर्ण शेतात मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करत ठिबक सिंचन लावले आहे. तर त्यांनी या पिकाला पाण्याच्या सोबतच खत देखील या मल्चिंग मशीनचा वापर करूनच दिल्यामुळे पाणी आणि वेळेची देखील बचत केली.
घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video
किती मिळते उत्पन्न? पारंपारिक ऊस शेती करत करत या वांग्याच्या शेतीकडे वळलेल्या सुदर्शन यांनी या शेतीतून लाखोंचा नफा आजवर मिळवला आहे. दरवर्षी सरासरी मिळणाऱ्या 8 लाख रुपये उत्पन्नातून मशागत खर्च साधारण 2 लाख सोडल्यास जवळपास 6 लाख रुपयांचा नफा सुदर्शन यांना फक्त या गॅलन वांग्याच्या शेतीतून मिळते. सुदर्शन जाधव : 9404973538