JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता भात शेती पुरे, शेतकऱ्याने शेतात केला नवीन प्रयोग, शून्य मशागत करून लाखो रुपये कमावले

आता भात शेती पुरे, शेतकऱ्याने शेतात केला नवीन प्रयोग, शून्य मशागत करून लाखो रुपये कमावले

पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक एसआरटी पद्धतीने पुण्याच्या भोरमधील शेतकऱ्याने दोडक्याची यशस्वी शेती केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 24 जून : महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. असाच एक प्रयोग  पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावातील शेतकऱ्याने केला आहे. पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक एसआरटी पद्धतीने त्यांनी दोडक्याची यशस्वी शेती केली आहे. शून्य मशागत पद्धतीने केली शेती  पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावच्या सुर्यकांत काळे यांनी एसआरटी म्हणजेच शून्य मशागत पद्धतीने दोडक्याची यशस्वी शेती केली आहे. एक एकरात सेंद्रिय किड नियंत्रक आणि खतांच्या योग्य नियोजनाने दोडक्याचे त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. सध्या दोडक्याला किलो मागे 45 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतोय. यामधून आतापर्यंत त्यांना लाखोंची कमाई झाली आहे.

मशागतीचा शून्य खर्च एसआरटी म्हणजेच शून्य मशागत पद्धतीने शेती केल्यानं मशागतीचा खर्चही वाचत आहे. दोडक्याच्या उच्च प्रतीमुळे दर चांगला मिळतोय. पुणे आणि परिरातल्या मार्केटमध्ये या दोडक्याला मागणी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांला याचा उत्तम फायदा होणार आहे.

Sangli News: तोट्यात जाणाऱ्या शेतीवर रामबाण उपाय, हा पर्याय देतोय हमखास उत्पन्न, Video

संबंधित बातम्या

इतर शेतकर्‍यांना मिळते प्रेरणा पुण्यातील भोलावडे गावच्या सुर्यकांत काळे यांचे शेतकर्‍यांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक एसआरटी पद्धतीचा वापर करत दोडक्याची यशस्वी शेती सूर्यकांत काळे यांनी केल्याबद्दल इतर शेतकर्‍यांना यातून प्रेरणा मिळत आहे. इतर शेतकर्‍यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी आणि त्यातून आर्थिक फायदा करून,  घ्यावा असे आवाहन सूर्यकांत काळे यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या