डूंगरमल गौड
नरेश पारीक, प्रतिनिधी चूरू, 18 जुलै : राजस्थान राज्यात एका 8 वी नापास शेतकऱ्याने केलेली कमाल पाहायला मिळाली आहे. चुरू जिल्ह्यातील एका 8वी नापास शेतकऱ्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 500 हून अधिक बोरीच्या झाडांची जात बदलली आहे. डूंगरमल गौड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते चुरू जिल्ह्याच्या रतनगढ तालुक्यातील आहे. त्यांनी फक्त आधुनिक शेतीच्या माध्यमातून फक्त स्वत:च नाही तर इतर शेतकऱ्यांनाही ते प्रेरित आहेत. गौड सांगतात की, त्यांच्या या कल्पनेमुळे शेतकरी आपली पारंपरिक शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न घेऊ शकतो. त्यांच्या या कल्पकतेची परिसरात जोरदार चर्चा आहे. अनेक जण त्यांना फोन करुन बोलवत आहेत. ते 8 नापास आहेत. पण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहतात. याच बळावर ते आज एक प्रगतीशील शेतकरी आहेत.
कसे घेतले प्रशिक्षण - गौड सांगतात की, त्यांनी देशीपासून विदेशी प्लांट तयार करण्याची ही कला सोशल मीडियावर पाहिली होती आणि ते त्यामुळे खूपच प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी डूंगर महाविद्यालयाचे असोशिएट प्राध्यापक डॉ. श्याम सुंदर ज्याणी यांची भेट घेतली आणि ही कला ते शिकले. यानंतर त्यांनी मागील चार वर्षांत 500 हून अधिक देशी काटेरी झाडांच्या जाती बदलल्या आहेत.
ते सांगतात की, देशी काटेरी झाडांची बोरं 30 ते 50 रुपये प्रति किलोने विकली जातात. तर थाय अॅप्पल आणि गोला व्हरायटी आणि काश्मिरी रेड अॅपल 100 ते 1500 रुपये प्रति किलोने विकले जातात. गौड याबाबत पुढे सांगतात की, देशी काटेरी झाडांचा सालात चीराल लावून थाय अॅप्पल या गोला व्हरायटीच्या सालीला बसवले जाते आणि तिथे प्लास्टिक पन्नी बांधून तिला प्रॉपर पद्धतीने कनेक्ट करुन सोडून दिले जाते. यानंतर 20 ते 25 दिवसांच्या आत याठिकाणी जोडलेल्या या जागेवरुन फूट पडते आणि 4 ते 6 महिन्यांच्या आत खूप चांगला आकार घेऊन घेतो. एका वर्षात प्रत्येक झाड हे 40 ते 50 किलो बोर सरासरी देऊ शकतो. या पद्धतीने तयार झालेले रोपे नर्सरीच्या रोपापेक्षा 4 पट लवकर मोठे होते. तसेच एका वर्षात उत्पादनही मिळून जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या कमाईसाठी, कमी कालावधीत मिळणारा हा एक चांगला स्त्रोत आहे, असे ते सांगतात.