JOIN US
मराठी बातम्या / मनी / Success Story: 23 वर्षांपूर्वीच ओळखलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व, आज आहे लाखोंची कमाई

Success Story: 23 वर्षांपूर्वीच ओळखलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व, आज आहे लाखोंची कमाई

अहमदनगर जिल्ह्यात साहेबराव भांड यांनी 23 वर्षांपूर्वी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. आता लाखोंची उलाढाल करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 5 जुलै: रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्य व जमिनीची पिकवन क्षमता या दोन्हींना धोका निर्माण होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील साहेबराव भांड यांनी 23 वर्षांपूर्वीच हे ओळखले. त्यामुळे धाड खुर्द गावातील आपल्या घरच्या शेतीसाठी त्यांनी गांडूळ खत निर्मिती करण्यास सुरुवात केली. साहेबराव यांच्या घरच्या शेतीतील समृध्द पिके पाहून सभोवतालचे शेतकरी त्यांच्याकडे गांडूळ खताची मागणी करू लागले. आता गांडूळ खत विक्रीतून ते लाखोंची कमाई करत आहेत. तसेच तरुणांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात पुढाकार घेत आहेत. सेंद्रिय शेतीसाठी सरकारचे प्रयत्न रासायनिक खत व औषधांचा वापर यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. शेती उत्पादनात घट होत आहे. पिके व भाजीपाल्यावर अनेक प्रकारची रासायनिक औषधी फवारली जात. यामुळे कसदार अन्न मिळत नाही. रासायनिक खत व औषधींचा दुष्परिणाम रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाकडून अनेक वर्षांपासून अनेक प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम 23 वर्षांपूर्वीच साहेबराव भांड या दूरदृष्टी असणाऱ्या शेतकऱ्याने केले.

सेंद्रिय शेती काळाची गरज संगमनेर तालुक्यातील ढाड खुर्द येथील साहेबराव भांड हे आधुनिक शेतकरी आहेत. रासायनिक खतांच्या वापरांमुळे होणारी हानी त्यांनी ओळखळी. सेंद्रिय शेती काळाची गरज आहे अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग अनुसरला. सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत निर्मितीवर भर देणे गरजे आहे. त्यासाठी सुरुवात स्वत:पासून केली. आपल्या शेतीसाठी 2000 साली त्यांनी नगर जिल्ह्यातील पहिला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. शेतात सुरू केली गांडूळ खत निर्मिती साहेबराव यांनी कित्येक वर्ष रासायनिक शेती केली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की रासायनिक शेतीवर होणारा खर्च कमी करणे आणि खराब होणारा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा संकल्प केल्यानंतर त्यांनी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. दुसऱ्या जिल्ह्यांतील गांडूळ खत प्रकल्पांना भेट दिली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपल्या घरी छोटासा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला. वडापावच्या गाड्यावर केला अनोखा प्रयोग, हॉटेल कामगार करतोय लाखोंची कमाई आता लाखोंची उलाढाल साहेबराव हे सुरुवातीला स्वतः साठी लागेल येवढ्या खताची निर्मिती करत होते. मात्र नंतर त्यांच्या या प्रयोगाची जिल्ह्यात चर्चा व्हायला लागली. इतर शेतकरी त्यांच्याकडे खताची मागणी करायला लागले. साहेबराव भांड यांनी उत्पादन वाढवले व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारू पाहणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करू लागले. स्वतःच्या शेतीपुरता सुरू केलेला त्यांचा गांडूळ खत निर्मितीचा आज जिल्हाभर विस्तार झाला आहे. ते यातून लाखोंची उलाढाल करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या