JOIN US
मराठी बातम्या / मनी / होम लोन फेडल्यानंतर न विसरता करा 'या' गोष्टी, नाहीतर येऊ शकतात अडचणी

होम लोन फेडल्यानंतर न विसरता करा 'या' गोष्टी, नाहीतर येऊ शकतात अडचणी

या आनंदाच्या क्षणांमध्ये, तुम्ही 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्हाला पुढील त्रास टाळता येईल. चला जाणून घेऊया

जाहिरात

या आनंदाच्या क्षणांमध्ये, तुम्ही 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्हाला पुढील त्रास टाळता येईल. चला जाणून घेऊया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर :  जर तुम्ही होम लोन (Home Loan) म्हणजे गृहकर्ज घेतलं असेल तर त्याचा EMI तुमच्या आर्थिक व्यवस्थापनावर खूप परिणाम करतो. म्हणूनच होम लोन लवकरात लवकर संपावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. होम लोन संपल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला बँकेला मोठी अमाउंट देण्याची गरज नसते आणि तुम्ही अतिरिक्त पैसे वाचवू शकता. त्याचबरोबर आता तुमचं घर खरोखरच तुमचं झालं आहे आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज उरलेलं नाही, या गोष्टीचं मोठं समाधानही तुम्हाला मिळतं. होम लोन संपून घर स्वतःचं होणं हा खरोखर आनंदाचा क्षण असतो. परंतु, या आनंदाच्या क्षणांमध्ये, तुम्ही 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्हाला पुढील त्रास टाळता येईल. चला जाणून घेऊया त्या 5 गोष्टी ज्या तुम्ही होम लोन फेडल्यानंतर न विसरता करायला हव्यात. कर्जदात्याकडून प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रं घेऊन या जेव्हा तुम्ही घरासाठी कर्ज घेता तेव्हा तुम्हाला घराची कागदपत्रं (Documents) बँकेत जमा करावी लागतात. म्हणजेच, घर तारण किंवा गहाण ठेवलं जातं. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना बँकेतून घराची मूळ कागदपत्रं घ्यायला विसरू नका. तसंच सर्व कागदपत्रं चांगल्या अवस्थेत आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्या. नो-ड्युज सर्टिफिकेट तुम्ही तुमचं कर्ज पूर्णपणे फेडलंय, असं हे सर्टिफिकेट सत्यापित करते. हे कर्जदात्याकडून नक्की घ्या. यासोबतच तुमच्या मालमत्तेवर कर्जदाराचा कोणताही क्लेम नाही, असंही त्यावर लिहिलेलं असतं. हे दस्तऐवजदेखील नीट तपासा आणि तुमचं नाव, पत्ता आणि इतर महत्त्वाचे तपशील नीट लिहिले आहेत की नाही ते पाहा. प्रॉपर्टीवरील लीन काढून टाका कर्जाची परतफेड होईपर्यंत दुसऱ्याची प्रॉपर्टी आपल्याजवळ ठेवण्याच्या अधिकाराला लीन (lien) म्हणतात. अनेक करदाते प्रॉपर्टीवर लीन लावतात. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्यानंतर ते तुमच्या प्रॉपर्टीवरून हटवून घ्या. एकदा लीन हटवल्यानंतर तुम्ही तुमची प्रॉपर्टी कोणत्याही त्रासाशिवाय विकू शकता. नॉन-इन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट आपल्या मालमत्तेच्या संबंधात झालेल्या सर्व व्यवहारांचा तपशील इन्कम्ब्रेंस सर्टिफिकेटमध्ये असतो. कर्ज देताना करदाता तुमच्या प्रॉपर्टीवर सिक्युरिटी म्हणून काही चार्जेस लावतो, त्याला इन्कम्ब्रेंस असं म्हणतात. नॉन-इन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट मिळवून तुमच्या प्रॉपर्टीवर आता कोणतेही चार्ज शिल्लक राहणार नाहीत याची खात्री केली जाते. क्रेडिट रेकॉर्ड अपडेट आहे की नाही ते तपासा जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा ते तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये (Credit Score) दिसते. कर्जाची परतफेड केल्यानंतर, तुमचं क्रेडिट रेकॉर्ड अपडेटेड असल्याची खात्री करा जेणेकरून भविष्यात कोणतंही कर्ज घेताना तुम्हाला क्रेडिट स्कोअरमुळे कोणतीही अडचण येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या